prakash jawadekar mp | Sarkarnama

संसद म्हणजे "ड्रामा थिएटर'नव्हे - प्रकाश जावडेकर

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 जुलै 2018

पुणे : केंद्र सरकारविरोधातील अविश्‍वास ठरावादरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाची चर्चा रंगली असतानाच, राहुल यांच्या भाषणातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी चालविला आहे. " राहुल यांनी एकही ठोस मुद्दा मांडला नसल्याने त्यांची अरिपक्वता दिसून आल्याची टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारून राहुल यांनी नाटक केल्याचे सांगत " संसद म्हणजे " ड्रामा थिएटर नव्हे.', अशा शब्दांत जावडेकरांनी राहुल यांची खिल्ली उडविली. 

संसदेतील आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार हल्ले केले. तेव्हा, मोदींना मिठी मारल्याच्या घटनेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. मोदी आणि राहुल यांच्या भाषणांवरून भाजप-कॉंग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर जावडेकर यांनी राहुल यांच्या भाषणात आणि कॉंग्रेसकडेच संसदेत मांडण्यासाठी प्रभावी मुद्दे नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, ""कॉंग्रेस नेत्यांकडे आता नाटक करण्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही. ""अविश्‍वास ठरावाची संसदेत झालेली चर्चा, संपूर्ण देशाने पहिली. राहुल यांच्या अपरिपक्व भाषणामुळे कॉंग्रेस पूर्णपणे उघडी पडली आहे. त्यांच्या भाषणात कोणताही ठोस मुद्दा नव्हता. आलिगंण देऊन मिठी मारण्याचे नाटक केले. परंतु संसद म्हणजे काही "ड्रामा थिएटर' नाही, नाटक करण्याचे ठिकाण नाही. मुद्दे मांडण्याचे ठिकाण आहे. कॉंग्रेसने कोणतेही मुद्दे संसदेत मांडलेले नाहीत'' 

""राफेल कराराबाबत प्रश्‍न उपस्थित केले गेले. परंतु संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारच्याच काळात हा करार झालेला आहे असे सांगून ते म्हणाले त्या करारातील गोपनीयता अजूनही पाळली जाते. यावरुन कॉंग्रेसचा गृहपाठही कच्चा होता, हे यातून दिसून आले. मोदी द्वेषावर कॉंग्रेस राजकारण करु इच्छित आहे. परंतु द्वेषावर केलेले राजकारण टिकत नाही.'', असेही वक्तव्य करत जावेडकर यांनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख