prakash javadekar and pune education field | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

जावडेकर यांच्या विधानाचा सार्वत्रिक निषेध

उमेश घोंगडे
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

पुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना शाळांच्या संबंधी व्यक्त केलेल्या विधानाचा आप सह, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी निषेध केला आहे. शाळांनी मदतीसाठी कटोरा घेऊन फिरण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडून निधी गोळा करावा, असे विधान केले होते. जावडेकर यांनी केलेल्या विधानाबद्दल जाहीर माफी मागावी, अन्यथा मनसे जावडेकरांना कटोरा भेट देणार आहे. 

अस्तित्वात नसलेल्या रिलायन्सलाच्या शिक्षण संस्थेला उच्च दर्जा देणाऱ्या जावडेकरांनी मराठी शाळांबाबत अशी भावना व्यक्त करणे त्यांच्या मानसिकतेला शोभेसे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी काही अपेक्षा ठेवणे उचीत नाही, या शब्दात मनसेने जावडेकरांची खिल्ली उडविली आहे. शाळांबाबत केलेल्या वक्तव्यावर जावडेकर यांनी खुलासा करावा तसेच मराठी शाळांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी मनसेने केली आहे. 

जावडेकर हे केंद्रातील जबाबदार मंत्री आहेत. त्यांच्याकडून करण्यात आलेले विधान जाणूनबुजून करण्यात आले असावे, अशी शंका "आप'च्यावतीते व्यक्त करण्यात येत अहे. खासगीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या या सरकारकडून त्या पद्धतीने वातावरण तयार करण्यासाठी जावडेकर यांना पुढे केले असावे, अशी शंका "आप'च्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील एक हजार 314 शाळा बंद करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले होते. राज्यातील शिक्षकांची तसेच प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त असताना ती भरली जात नाहीत. यामागे शिक्षणाकडे बघण्याचा केंद्र व राज्य सरकारचा दृष्टीकोन लक्षात येत असून जावडेकर हे त्याचे प्रतिनिधी आहेत, अशी टीका "आप'च्यावतीने करण्यात आली आहे. 

विविध शिक्षण संस्था तसेच शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जावडेकर यांच्या विधानाबद्दल संताप व्यक्त केला आहे. मात्र सरकारच्या भीतीने यातील अनेकजण बोलायला तयार नाहीत, 

संबंधित लेख