आंबेडकरानी मोठा भाऊ म्हणून नेतृत्व करावे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभियेंचे आवाहन

"धर्मनिरपेक्ष विचारांच्या लोकांना एकत्र आणण्याची गरज आहे. भारिप-बहुजन महासंघाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करावी तसेच केंद्रात आणि राज्यात भाजप-सेना युती सरकारला सत्तेबाहेर फेकत धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करण्यात आपण श्रेय घ्यावे. आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षांचे मोठे भाऊ होऊन नेतृत्व करावे," असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केले आहे.
Prakash Ambedkar - Prakash Gajbhiye
Prakash Ambedkar - Prakash Gajbhiye

नागपूर : "धर्मनिरपेक्ष विचारांच्या लोकांना एकत्र आणण्याची गरज आहे. भारिप-बहुजन महासंघाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करावी तसेच केंद्रात आणि राज्यात भाजप-सेना युती सरकारला सत्तेबाहेर फेकत धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करण्यात आपण श्रेय घ्यावे. आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षांचे मोठे भाऊ होऊन नेतृत्व करावे," असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केले आहे.

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर नागपुरात आले असता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी भारिप-बहुजन महासंघाने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत सामील व्हावे, अशी गळ घातली. समविचारी आणि धर्मनिरपेक्ष तसेच आंबेडकरी मतांचे विभाजन होणार नाही. आंबेडकरी जनता विभागली जाणार नाही. यामुळे राज्यात भाजप-सेना यांचा पराभव निश्‍चित होईल. राज्यात आणि केंद्रात भाजप- सेना युतीला सत्तेबाहेरचा रस्ता दाखवावा आणि त्यांना पराभूत करण्याचे श्रेय बाळाबाहेबांनी घ्यावे, असेही आमदार गजभिये यांनी आंबेडकर यांच्याकडे बोलून दाखविले.

1998 मध्ये शरद पवार, सोनिया गांधी यांच्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आघाडी केली होती. त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चार खासदार निवडून आले आणि 100 टक्के निकाल लागला होता. महाराष्ट्रात आंबेडकरी जनतेने एकच जल्लोष केला होता. यावेळी असेच काहीसे समीकरण होईल असा विश्वास व्यक्त करीत, मनातील हेवेदावे विसरून आपणच मोठ्या भावाची भूमिका वठवावी. आपण पुढाकार घेऊन सर्व धर्मनिरपेक्ष विचाराच्या पक्षांना एकत्र आणावे आणि राज्यात यूपीए आघाडी मजबूत करून भाजप-सेना युती सरकारला सत्तेतून बाहेर काढावे अशी विनंतीही आ. गजभिये यांनी बाळासाहेबांना केली.

राज्यात बेरोजगारी वाढली आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला असून आत्महत्येला कवटाळत आहे. दुष्काळाने राज्यातील 300 हून अधिक तालुके प्रभावित झालेले आहेत. राज्यातील व देशातील शेतकरी, कारखानदार, व्यापारी, विद्यार्थी कुठलाच घटक या सरकारमध्ये खुश नाही. यासाठी धर्मनिरपेक्ष विचाराचे सरकार स्थापन करण्यासाठी आपण मोठे भाऊ म्हणून पुढाकार घ्यावे आणि याचे श्रेय आपण घ्यावे, अशी आग्रहाची विनंती बाळासाहेब आंबेडकर यांना आ. गजभिये यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com