prakash gajbhiye and ganpati | Sarkarnama

आमदार गजभियेंची "गणेश भक्ती' थेट 151 फुटांची !

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांच्यातर्फे नागपुरात दरवर्षी 151 फूट उंचीची श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गेल्या 28 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. त्यामुळे नागपुरातील हिलटॉप परिसरात गणेशोत्सवाच्या काळात या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी नागपूरकरांची रिघ लागलेली असते. 

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांच्यातर्फे नागपुरात दरवर्षी 151 फूट उंचीची श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गेल्या 28 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. त्यामुळे नागपुरातील हिलटॉप परिसरात गणेशोत्सवाच्या काळात या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी नागपूरकरांची रिघ लागलेली असते. 

प्रकाश गजभिये यांचा हिलटॉप परिसर बालेकिल्ला मानला जातो. महापालिका निवडणुकीत याच मतदारसंघातून ते सातत्याने निवडून येत होते. झोपडपट्टीने घेरलेला हा भाग नागपूरच्या पश्‍चिम भागात आहे. या भागात त्यावेळी मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होत नव्हती. या काळात जवळपास 28 वर्षांपूर्वी त्यांनी 151 फुटांची मूर्तीची स्थापना करून नागपूरकरांचे लक्ष वेधले. या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी क्रेन आणावी लागली होती. त्यामुळे क्रेनच्या सहाय्याने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणारे हिलटॉप गणेश मंडळ नागपुरातील पहिलेच गणेश मंडळ ठरले. 

प्रत्येक वर्षी भाविकांची गर्दी वाढत गेल्याने गजभिये यांनी मग वेगवेगळे देखावे करण्यात सुरू केली. यावर्षी देशभर गाजलेल्या "बाहुबली' या चित्रपटावर आधारित देखावा तयार केला आहे. दुपारपासून हा देखावा पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळत असते. गणपतीचे दहा दिवस आमदार गजभिये गणेशमूर्तीजवळ असतात. येणाऱ्या भाविकांना हात जोडून अभिवादन स्वीकारणे सुरू असते. नागपुरातील ही मूर्ती सर्वात मोठी असल्याने या मूर्तीचे विसर्जनही सर्वात शेवटी होते. 

प्रतिसाद सतत वाढतोय 
सर्वधर्मसमभावाचे प्रतिक म्हणून हिलटॉप गणेश मंडळाच्या श्री गणेशाच्या मूर्तीकडे पाहिले जाते. गेल्या 28 वर्षांपासून सातत्याने शहरातील सर्वात उंच मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. नागपूरकरांचा प्रतिसाद दरवर्षी वाढत आहे. गणेशोत्सवाच्या काळात पाऊस असतानाही भाविकांची गर्दी कमी झालेली नाही. अशी प्रतिक्रीया प्रकाश गजभिये यांनी व्यक्त केली. 

संबंधित लेख