Prakash Ambedkar"s Akola Pattern in new format | Sarkarnama

बाळासाहेब आंबेडकरांनी आणला सोशल इंजिनिअरिंगचा ‘अकाेला पॅटर्न’ आता नव्या स्वरूपात !

श्रीकांत पाचकवडे :  सरकारनामा ब्युराे
गुरुवार, 1 जून 2017

भारिप-बमसंमध्ये वाढलेली गटबाजी माेडून काढण्यासाठी तसेच सत्तेभाेवती पक्ष अाणि कार्यकर्ते फिरू नयेत, चळवळ म्हणून राजकीय पक्ष अाणि मिळाली तर सत्ता हा मंत्र अाजच्या अाेबीसी मेळाव्यातून अकाेलेकरांपुढे अाला. अाजच्या मेळाव्यात पक्षातील अामदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी अामदारांसह सर्वच पदाधिकारी व्यासपिठासमाेर कार्यकर्ते म्हणुन बसविण्यात अाले हाेते. व्यासपीठावर  केवळ बाळासाहेब अांबेडकर हेच असल्याने पक्षातंर्गत गटबाजीवर यापुढे केला जाणारा जालीम उपाय काय असेल? याची कल्पना सर्व कार्यकर्ते अाणि पदाधिकाऱ्यांना यानिमित्याने अाल्याचे दिसते. 

अकाेला: बहुजन, मागासवर्गीयांच्या चळवळीत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष केंद्रीत करणाऱ्या भारिप बहुजन महासंघाचा ‘अकाेला पॅटर्न’ पुन्हा नव्या स्वरूपात येत आहे .

 राष्ट्रीय राजकारणातील प्रश्न अाणि निवडणूका यावर माेर्चे, अांदाेलने करीत अाता बाळासाहेब अांबेडकरांनी अाेबीसी, शेतकऱ्यांवर हाेत असलेल्या अन्यायाला वाचा फाेडत अागामी लाेकसभा, विधानसभा निवडणुकीची व्युव्हरचना अाखणे सुरू केले अाहे.

 त्याचाच एक भाग म्हणून ‘एकच पर्व अाेबीसी सर्व’ अशी कॅच लाईन देत भारिप-बमसंकडून अकाेल्यात पहिला अाेबीसी मेळावा घेऊन अागामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले अाहे. 

 

महाराष्ट्रात 1980 च्या दशकात सम्यक समाज अांदाेलनाच्या माध्यमातून ऍड  बाळासाहेब अांबेडकरांची सामाजिक कार्याची सुरूवात झाली. नागपूर येथे भारतीय बाैद्ध महासभेच्या अधिवेशनानिमित्त प्रचारासाठी बाळासाहेब पहिल्यांदा अकाेल्यात अाले हाेते. तेव्हा अांबेडकरी जनतेने बाबासाहेबांच्या नातू म्हणून त्यांना अक्षरशा डाेक्यावर घेतले.

 

 ग्रामीण भागातील भरटकलेल्या दलित, मागासवर्गीय, मुस्लीम, बहुजनांना एकत्रीत करीत बाळासाहेबांनी साेशल इंजिनिअरिंगचा ‘अकाेला पॅटर्न’ राबविला. या पॅटर्नचा फायदा लाेकसभेच्या दाेन निवडणूकांमध्ये खासदार म्हणून त्यांना मिळाला. जिल्हा परिषद असाे की पंचायत समिती भारिप-बमसंची या स्थानिक स्वराज्य संस्थांवर अभेद सत्ता गाजली.

 

 मात्र, मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यात पक्षातंर्गत वाढलेल्या कुरघाेडीच्या राजकारणामुळे कार्यकर्ते कमी अाणि नेतेच जास्त झाल्याने अापसी मतभेद वाढले. या कुरघाेडीच्या राजकारणाचा फटका 2004, 2009, 2014 मध्ये झालेल्या लाेकसभा निवडणुकांमध्ये बाळासाहेबांना सहन करावा लागला. निवडणुकांमध्ये अालेल्या या अपयशाची कारणमीमांसा करीत पक्षाला नवचेतना देण्यासाठी बाळासाहेब अांबेडकरांनी अाता पुन्हा कंबर कसली अाहे. 

त्यानुषंगाने पक्षाचे मुखपत्र म्हणून प्रबुद्ध भारत या पाक्षीकाची सुरूवात दहा मे 2017 पासून करण्यात अाली अाहे. लाेकापर्यंत अापले विचार पाेहचविण्यासाठी बाळासाहेब अाता थेट मैदानात उतरल्याचे दिसून येते. भारिप बहुजन महासंघ हा केवळ अकाेल्यापुरता मर्यांदीत न ठेवता राष्‍ट्रीय राजकारणात अापला प्रभाव कायम ठेवण्यासाठी पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, तामीळनाडू, कर्नाटक अादी राज्यात राबता वाढवित अाहेत. 

दिल्लीत काढलेले माेर्चे, अांदाेलने, राष्ट्रीय विषयांवर विविध ज्वलंत प्रश्नांवर बाळासाहेब अाता अाक्रमक झाल्याचे दिसत अाहे. त्याला 2019 मध्ये हाेणाऱ्या लाेकसभा, विधानसभा अाणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डाेळ्यासमाेर ठेऊन हे सर्व हाेत अाहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष संघटन अधिक मजबुत करण्याचा प्रयत्न बाळासाहेब करीत अाहेत. 

त्यातूनच अाेबीसी, शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फाेडत भाजप सरकार विरुद्ध बाळासाहेबांच्या टीकेची धार अधिक अाक्रमक झाली अाहे. अकाेला लाेकसभा मतदार संघातील सामाजिक समिकरण पाहिल्यास कुणबी, माळी, तेली, साेनार, धाेबी, भाेई, धनगर, काेळी अशा अनेक लहान-माेठ्या जाती अाेबीसीमध्ये येतात. यातील बहुतांश समाजबांधव हे अल्पभुधारक शेतकरी अाहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर शेतकऱ्यांच्या  दैनावस्थेला सत्ताधारी भाजप साेबतच काँग्रेस-राष्ट्रवादीला जबाबदार धरून  टिकास्त्र साेडत अाहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीने कितीही यात्रा काढल्या तरी त्याचा काही फायदा झाला नाही. उद्या तुम्ही अात्मदहन करताे असे जरी म्हटले तर हे भाजपवाले तुम्हाला माचीस अाणून देतील. कारण ते उलट्या काळजाचे अाहेत, त्यांना शेतकऱ्यांचे दुःख समजत नाही, अशी प्रखर टिका करीत बाळासाहेबांनी भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबाेल चढविला अाहे.

 शेतकऱ्यांच्या दैनावस्थेला सरकारचे शेतकरी विराेधी धाेरण कारणीभूत अाहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करू नका. किमान दहा एकराखालील शेतकऱ्यांना तरी कर्जमाफी द्या, अशी मागणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा ते मांडत अाहेत.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता केंद्र व राज्यात सत्तधारी भाजपविरुद्ध जनतेमध्ये प्रचंड राेष वाढत अाहे. या असंतोषास योग्य दिशा देऊन  अागामी लाेकसभा, विधानसभा निवडणूकांमध्ये भारिप - बहुजन महासंघरची ताकद वाढविण्याची ही मोर्चेबांधणी  मानाजी जात आहे .

 त्यामुळे बदलत्या राजकारणात पक्षाला अालेली मरगळ दुर करून अापले पक्षाच्या ताकदीचा आलेख उंचावण्यासाठी बाळासाहेब अांबेडकरांनी पुन्हा एकदा ‘अकाेला पॅटर्न’ नव्या स्वरूपात आणण्याची व्यूहरचना आखलेली  दिसते . 

जातीअंत लढा  ते  शेतकऱ्यांचा लढा

जातीच्या भिंती माेळीत काढायच्या असतील तर जात ही शाळेच्या दाखल्यावरून हद्दपार केल्या गेली पाहिजे, यासाठी बाळासाहेब अांबेडकर यांनी महाराष्ट्रभर जातीअंत परिषदा घेतल्या. त्यानंतर अाता शेतकऱ्यांच्या लढ्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले अाहे.

अकाेला जिल्ह्यातील घाटाेळ नामक शेतकरी अात्महत्या प्रकरणात बाळासाहेबांनी तत्कालीन युपीए अध्यक्ष साेनिया गांधी, पंतप्रधान मनमाेहन सिंग, तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या विराेधात याचिका दाखल करून या याचिकेत स्वतः वकिल म्हणून लढले हाेेते. ताेच धागा पकडत अाज भारिप-बमसंकडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत अाहे. 

2019 च्या लाेकसभा निवडणुकीकरीता डावी अाघाडी अाणि प्रादेशिक पक्षांचा समविचारी मंच उभा करण्यासाठी त्यांनी नुकतीच बी. राजा, सिताराम येचुरी, नितीश कुमार अशा अनेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या अाहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत या अाघाडीवर शिक्कामाेर्तंब झाल्यास राष्ट्रीय राजकारणावर त्याचे किती परिणाम हाेतात, हे पाहणे अाैत्सुक्याचे ठरणार अाहे.  

 

 

 

संबंधित लेख