प्रकाश आंबेडकरांनी राजीनामा द्यावा : लक्ष्मण माने

प्रकाश आंबेडकरांनी राजीनामा द्यावा : लक्ष्मण माने

पुणे : वंचित विकास आघाडीत उभी फूट पडली असून माजी आमदार लक्ष्मण माने यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधत त्यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. एका दूरचित्रवाहिनीवर आघाडीेचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनाही माने यांनी टोमणा मारला. पडळकर यांच्या आयत्या पिठावर रेघोट्या असल्याची टीका माने यांनी केली.

आमचा पक्ष हा भाजपला आंदण दिला आहे. त्यामुळे पुरोगामी पक्षांची हार होत आहे, असे सांगत माने यांनी आंबेडकर यांच्यापेक्षा वेगळी भूमिका मांडली. माने यांच्या या तोफगोळ्यामुळे वंचित विकास आघाडीत आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पडळकर हे संघात होते. भाजपचे कार्यकर्ते होते. संभाजी भिडेंशी त्यांचे संबंध आहेत, अशी टीका माने यांनी केली. माने यांना प्रदेशाध्यक्षपद हवे होते. ते न मिळाल्याने माने यांची खदखद सुरू असल्याचे प्रत्युत्तर पडळकर यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com