सत्तेसाठी दंगल हा भाजपचा बेस  प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून राज्यातील भटक्‍या विमुक्‍त जाती-जमातींना एकसंघ करण्यात येत आहे. आता सत्तेच्या सिस्टिममध्ये जाण्यापेक्षा ती सिस्टिमच ताब्यात घेण्यात येईल. आगामी निवडणुकांपूर्वी आरक्षण, पाक प्रश्‍नावरुन प्रश्‍नावरुन दंगली होण्याची शक्‍यता आहे -प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ
सत्तेसाठी दंगल हा भाजपचा बेस  प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

सोलापूर : भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून आजवर दर तीन-चार महिन्याला सामुहिक अत्याचाराची घटना घडते. मागील दोन महिन्यांपासून मुले पळवणारी टोळी दाखल झाल्याचा मेसेज व्हायरल झाला आणि तो आदिवासी भागापर्यंत पोहचला. त्यामुळे बीड, नंदूरबार, धुळे या भागात चार घटना घडल्या. याचा शोध का लागत नाही? असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. सत्तेसाठी दंगली घडविणे हा भाजपचा बेस असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

मंगळवेढ्यातील डवरी गोसावी समाजाच्या चौघांची धुळ्यात हत्या झाली. त्यांच्या कुटुंबाला भेटण्याकरिता आंबेडकर सोलापुरला आले होते. त्यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी लेखक लक्ष्मण माने, माजी आमदार विजय मोरे, अर्जुन सलगर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, ''हत्या झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली म्हणजे सरकारची जबाबदारी संपली असे नाही. त्यांना न्याय देण्याकरिता या प्रकरणाची सायबरसेल द्वारे सखोल चौकशी व्हावी." 

भटक्‍या विमुक्‍त जाती-जमातीच्या पुनर्वसनासाठी त्यांना बागायती शेतजमिनी द्याव्यात, घरकुल योजनांचा प्राधान्याने लाभ देण्याची गरज आहे. परंतु, सरकारकडून मिळेल त्या मुद्‌द्‌यांवर देशात आणि राज्यात अराजकता माजविण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com