प्रकाश आंबेडकरांचा अकोल्यातूनही अर्ज

वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रकाश आंबेडकरांनी काल सोलापुरातूनही आपली उमेदवारी दाखल केली आहे.
प्रकाश आंबेडकरांचा अकोल्यातूनही अर्ज

अकोला : वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रकाश आंबेडकरांनी काल सोलापुरातूनही आपली उमेदवारी दाखल केली आहे. 

येथील स्थानिक टॉवर चौकातील पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मोठी रॅली काढत त्यांनी शक्तिप्रदर्शन केले आहे. आजच कॉंग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आंबेडकरांनी काँग्रेसने आपल्या
पराभवासाठी कट रचल्याचा आरोप यावेळी केला.

अकोल्यातून लढण्याबाबत आज अखेर सर्व चर्चांना प्रकाश आंबेडकरांनी पुर्ण विराम दिला. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून आज अकोल्यातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच
सोलापूर आणि अकोला अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आज प्रकाश आंबेडकरांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत विरोधकांना इशारा देण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरांनी स्थानिक टॉवर चौकातील पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी
कार्यालय अशा काढलेल्या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते. 

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, की मी वंचित बहुजन आघाडीचा प्रमुख असून संपूर्ण वंचित बहुजन समाज माझ्या पाठीशी आहे. तर दुसरीकडे मुस्लीम समाज हा
आरएसएसला आपला विरोधी मानतो. त्यामुळे आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी मीच काँग्रेसला प्रस्ताव दिला होता. त्यामुळेच मला पाडण्यासाठी अकोल्यात मुस्लिम उमेदवार दिल्याचा आरोप आंबेडकरांनी काँग्रेसवर केलाय. मी
मुस्लिमांजवळ आणि वंचित बहुजन आघाडीचा म्होरक्या असल्याने काँग्रेसला हे सर्व खटकत असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे. अकोल्यात आपली लढत
भाजपशी असून काँग्रेस लढतीतच नसल्याचा चिमटा त्यांनी घेतलाय.

काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कार्यकर्त्यांची अपेक्षित गर्दी न जमल्यानं काँग्रेसनं मिरवणूक न काढता साधेपणानंच उमेदवारी अर्ज दाखल केलाय. प्रकाश आंबेडकर हे भाजपला मदत करीत असल्याचा आरोप हिदायत पटेलांनी यावेळी आंबेडकरांवर लावलाय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com