prakash ambedkar declares candidate from buldana loksabha constituency  | Sarkarnama

प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केला पहिला उमेदवार

श्रीधर ढगे 
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

वंचित बहुजन आघाडीतर्फे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम शिरस्कार यांना बुलडाणा लोकसभेची उमेदवारी शेगांव येथील वंचित माळी समजा राजकीय एल्गार परिषद मध्ये जाहीर करण्यात आली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सभेत ही घोषणा केली. 

शेगाव : वंचित बहुजन आघाडीतर्फे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम शिरस्कार यांना बुलडाणा लोकसभेची उमेदवारी शेगांव येथील वंचित माळी समजा राजकीय एल्गार परिषद मध्ये जाहीर करण्यात आली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सभेत ही घोषणा केली. 

वंचित बहुजन आघाडी सोबत काँग्रेसची चर्चा सुरू असून आघाडी बाबत निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी आज मोठी घोषणा करत लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पाहिला उमेदवार बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा जाहीर केला आहे. भारिप बहुजन महासंघाचे बाळापूर मतदार संघाचे विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली.
 
राज्यातील लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर करत आंबेडकर यांनी राजकीय पक्षांना एक प्रकारे धक्का दिला आहे. बुलढाणा लोकसभा मतदार संघात सध्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे खासदार आहेत. आमदार बळीराम सिरस्कार हे माळी समाजाचे आहेत. माळी कार्ड सोबतच एमआयएम, भारिप-बमसंची वोट बँक ही वंचित आघाडीची जमेची बाजू आहे. आंबेडकरांनी आमदार सिरस्कार यांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसला हा मोठा धक्का आहे.

संबंधित लेख