prakash ambedkar comes first at koregaon bheema | Sarkarnama

विजयस्तंभाला अभिवादन करण्यात नेत्यांमध्ये प्रकाश आंबेडकर प्रथम

अमोल कविटकर
मंगळवार, 1 जानेवारी 2019

पुणे : भारीप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज नेत्यांमध्ये सर्वात प्रथम येऊन कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन केले. सकाळी सात वाजताच येऊन त्यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले. आंबेडकर यांची येेथे सभा घेण्याची प्रथा नाही. त्यामुळे त्यांची सभा होणार नाही. मात्र इतर पाच नेत्यांच्या या ठिकाणी सभा होणार आहेत.

विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी जमली आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे दाखल झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. तसेच प्रशासनानेही नागरी व्यवस्था पुरविण्याचा प्रयत्न केला आहे.

आंबेडकर यांनी लोकांच्या एकत्र येण्याचे या वेळ कौतुक केले. `सरकारनामा`शी बोलताना त्यांनी सांगितले की लोक एकत्र आहेत. गावकऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलेलं जे गेल्या वेळी घडलं, ते पुन्हा घडणार नाही. मात्र
गावकऱ्यांचा मान सरकारने राखला पाहिजे होता, तो राखलेला नाही. मागच्यावेळी जे घडलं ते बाहेरच्या लोकांनी येऊन घडवलं
ज्यांनी मागच्या वेळी येऊन घडवलं त्यांना नोटिसा दिल्या नाहीत. मराठा समाज आणि ओबीसी समाजात दंगली होऊ नयेत आणि समनव्यय राहावा, यासाठी प्रयत्न केले यांनाच नोटिसा दिल्या गेल्या.

 सरकारचा हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप करत मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना मात्र नोटीस दिलेली नाही. मराठा समाज आणि ओबीसीमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. ती दरी मिटवण्याचा प्रयत्न एल्गार परिषदेच्या माध्यमातून झाला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली गेली, अशी टीका त्यांनी केली.

संबंधित लेख