prakash ambedkar birthday | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

आजचा वाढदिवस - अॅड. प्रकाश आंबेडकर - भारिप बहुजन महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष.

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 मे 2018

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बहुजन, मागासवर्गीयांच्या चळवळीचे नेते म्हणून भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांची ख्याती आहे. राज्यात 1980 च्या दशकात सम्यक समाज आंदोलनाच्या माध्यमातून ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सामाजिक कार्याची सुरवात केली. नागपूर येथील भारतीय बौद्ध महासभेच्या अधिवेशनानिमित्त प्रचारासाठी ऍड. आंबेडकर पहिल्यांदा अकोल्यात आले आणि येथूनच त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याला उभारी मिळाली. भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट केली.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बहुजन, मागासवर्गीयांच्या चळवळीचे नेते म्हणून भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांची ख्याती आहे. राज्यात 1980 च्या दशकात सम्यक समाज आंदोलनाच्या माध्यमातून ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सामाजिक कार्याची सुरवात केली. नागपूर येथील भारतीय बौद्ध महासभेच्या अधिवेशनानिमित्त प्रचारासाठी ऍड. आंबेडकर पहिल्यांदा अकोल्यात आले आणि येथूनच त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याला उभारी मिळाली. भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट केली. 1998 व 1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना दोन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व दिले. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेत "सोशल इंजिनिअरिंगचा अकोला पॅटर्न' ची यशस्वी अंमलबजावणी करीत त्यांनी अनेकांना आमदारकी, मंत्रिपद, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदावर बसविले. त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या पॅटर्नमुळे गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्हा परिषदेवर भारिप बहुजन महासंघाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.  
 

संबंधित लेख