आंबेडकर-ओवेसी एकत्र येणार, कॉंग्रेसची डोकेदुखी वाढणार! 

आंबेडकर-ओवेसी एकत्र येणार, कॉंग्रेसची डोकेदुखी वाढणार! 

पुणे: भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आगामी निवडणुकांत एकत्रीत येणार आहेत. त्यामुळे कॉंग्रस आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

प्रकाश आंबेडकरचा प्रभाव अकोला जिल्ह्यापुरता असलातरी भीमा कोरेगाव दंगलीनंतर परिस्थिती बदलली आहे. राज्यभरात प्रभाव पाडू शकतील, इतपत ताकद आंबेडकरांनी जमवली आहे. त्यांनी बहुजन वंचित आघाडीचा प्रयोग सुरु केला असून धनगर, माळी, भटके, छोटे ओबीसी घटक एकत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता त्यांनी एमआयएमशी युती करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याला आमदार इम्तियाज जलील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे दोन आमदार निवडून आले. अनेक मतदारसंघात त्यांनी दखलपात्र मते घेतली. त्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार पराभूत झाले. त्यानंतर कॉंग्रेस आघाडीकडून एमआयएमला सातत्याने टार्गेट करण्यात आले. कर्नाटकातही एमआयएमला रोखण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला. ओवेसींच्या सभांना बंदी घालण्यात आला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ओवेसींनी जेडीएस-बसपा युतीला पाठिंबा दिला होता. 

महाराष्ट्राच्या बाबतीत कॉंग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घेवून महाआघाडीचा प्रयत्न करणार आहे. या आघाडीत कॉंग्रेसला प्रकाश आंबेडकर हवे आहेत, मात्र आंबेडकरांनी त्यांना अटी घातल्या आहेत. कॉंग्रेसकडून एमआयएमला मात्र दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी हाक दिल्यास लगेच हो म्हणण्याची एमआयएमची तयारी दिसते आहे. या संभाव्य युतीमुळे अनेक शहरी मतदारसंघांची गणिते बदलू शकतात. त्याचा मोठा फटका कॉंग्रेस आघाडीला बसू शकतो. आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या फॉर्म्युला चालला तर त्यांना चांगले राजकीय यशही मिळू शकते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com