prakash ambedkar -asaduddin owaissy meeting in aurangabad | Sarkarnama

आमदार जलील यांच्या घरी आंबेडकर- ओवैसी यांच्यात गुप्त बैठक

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

मंगळवारी होणाऱ्या सभेसाठी भारीप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन औवेसी येथे दाखल झाले आहेत. या दोन नेत्यांमध्ये रात्री उशिरा गुप्त बैठक सुरु झाली.

औरंगाबाद : मंगळवारी होणाऱ्या सभेसाठी भारीप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन औवेसी येथे दाखल झाले आहेत. या दोन नेत्यांमध्ये रात्री उशिरा गुप्त बैठक सुरु झाली.

आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी आणि ओवैसीचा एमआयएम महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी एकत्रित येणार आहेत. त्यांची मंगळवारी दुपारी शहरात सभा होत आहेत. या सभेत या दोन्ही नेते युतीची घोषणार करणार आहेत. या सभेच्या यशस्वीतेसाठी संपुर्ण मराठवाड्यात प्रचार, प्रसार करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री ओवैसी शहरात दाखल झाले. ते आमदार इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी थांबलेले असताना प्रकाश आंबेडकर शहरात आले. त्यानंतर ते जलील यांच्या घरी गेले. तिथे ओवैसींनी आंबेडकरांचे स्वागत केले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात हाही उपस्थित होता. स्वागत समारंभानंतर या दोन नेत्यांमध्ये गुप्त बैठक सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत आणि वंचित आघाडीच्या पुढच्या डावपेचाबाबत दोघांत चर्चा सुरु असल्याचे समजते. 

संबंधित लेख