आंबेडकरांचे सोशल इंजिनिअरिंग : 'वंचित'कडून बारा बलुतेदार लोकसभेच्या रिंगणात

बाराबलुतेदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरविताना आतापर्यंत जाहीर केलेल्या 13 उमेदरावांमध्ये धनगर, माळी, मुस्लीम उमदेवारांना प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून येते.
आंबेडकरांचे सोशल इंजिनिअरिंग : 'वंचित'कडून बारा बलुतेदार लोकसभेच्या रिंगणात

अकोला :  धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडीचा जन्म पंढरपुरात झाला. त्यानंतर राज्यातील वंचितांना सोबत घेवून   प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. 

बाराबलुतेदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरविताना आतापर्यंत जाहीर केलेल्या 13 उमेदरावांमध्ये धनगर, माळी, मुस्लीम उमदेवारांना प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून येते.

सामाजिक असो वा राजकीय क्षेत्रात वंचितांना न्याय मिळत नाही. त्यामुळे त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजना आघाडीची स्थापना करीत असल्याचे जाहीर केले. समाजातील बारा बलुतेदारांना सोबत घेवून राज्यात तिसरा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न झाला. त्याला साथ मिळाली ती एमआयएमची. 

माळी, कोळी, कुणबी, तेली, धनगर, बौद्ध, मातंग, बंजारा आणि मुस्लील असे अठरापगड जाती-धर्माचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीसोबत आले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीपुढे लोकसभा निवडणुकीसाठी 12 जागांचा प्रस्ताव ठेवला. सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत कॉंग्रेसने भूमिका जाहीर करण्याचे आवाहनही केले. त्यासाठी लेखी कृती आराखडाही मागितला.

दुसरीकडे कॉंग्रेस आघाडीतील दोन्ही प्रमुखपक्षांनी   प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी चार जागा सोडण्याची तयारी दर्शविली. मात्र, आरएसएसबाबतची भूमिका आणि 12 जागांच्या मागणीवर ठाम असलेले   आंबेडकर यांनी आतापर्यंत 13 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली. ही नावे जाहीर करताना वंचित आघाडीसोबत असलेल्या बारा बलुतेदारांना प्राधान्य देते सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविण्यावर त्यांचा भर असल्याचे दिसून येते.

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून वंचित आघाडीची निव ठेवल्या गेली. त्या धनगर समाजाला आतापर्यंत चार लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. यात नांदेड, सांगली, मांढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. याशिवाय दोन माळी, दोन मुस्लीम उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. बौद्ध, कोळी, होलार, बजारा आणि मातंग समाजातील प्रत्येकी एका उमेदवाराची नावे जाहीर करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार

आमदार बळीराम सिरस्कार , माळी समाज ,बुलडाणा
विठ्ठल लक्ष्मण सातव ,माळी समाज ,पुणे

प्रा. प्रवीण पवार, बंजारा समाज , यवतमाळ-वाशीम

गुणवंत देवपारे ,बौद्ध समाज , अमरावती

रामभाऊ गारकर ,मातंग समाज , लातूर

डॅ. यशपाल भिंगे ,धनगर समाज ,नांदेड

विजयराव मोरे ,धनगर समाज ,माढा

जयसिंग उर्फ तात्या शेंडगे ,धनगर समाज , सांगली

नवनाथ विष्णू पडवळकर ,धनगर समाज ,बारामती

इंजिनिअर हाशमी, मुस्लीम समाज ,धुळे-मालेगाव

सहदेव अहिवळे ,होलार समाज , सातारा

नितीन कांडेलकर ,कोळी समाज ,जळगाव 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com