prakash ambedkar and congress | Sarkarnama

कॉंग्रेस-भारिप बहुजन महासंघाच्या आघाडीत खोडा नक्की कुणाचा याचीच चर्चा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

अकोला : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कॉंग्रेस आणि भारिप बहुजन महासंघाच्या आघाडीचा गुंता अद्यापही सुटलेला नाही. भारिपने एमआयएमशी आघाडी करून मोर्चेबांधणीला सुरूवात केली. मात्र, समविचारी पक्ष म्हणून कॉंग्रेस आणि भारिप बमसंच्या आघाडीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून केवळ चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात असल्याने आघाडी करण्यास नेमका कुणाचा विरोध आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे. 

आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यादृष्टीने सर्वचा राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. आगामी निवडणुकीत कसेही करून सत्ताधारी भाजप-शिवसेनेला खाली खेचण्याचा चंग कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने बांधला असून त्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेण्याची रणनिती आखली जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षभरात भीमा कोरेगाव प्रकरणानंतर भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय नेतृत्वाला चांगलीच झळाळी मिळाली. 

गेल्या वर्षभरापासून राष्ट्रीय आणि राज्यातील राजकारणात आंबेडकरांनी वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच सत्ता परिवर्तन करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाला सोबत घेत आघाडी करण्याच्या हालचाली कॉंग्रेसकडून सुरू झाल्या. मात्र, भारिपने त्याआधीच एमआयएमशी आघाडी केल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीने एमआयएमशी आघाडी करण्यावरून नकारघंटा लावली आहे. 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना आम्ही एमआयएमशी आघाडी करणार नसून भारिप-बमसंशी आघाडीसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे जाहीर केले. तर कॉंग्रेसकडून केवळ माध्यमांमध्येच आघाडीच्या चर्चा केल्या जात असून प्रत्यक्षात कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून जागा वाटप किंवा आघाडीसंदर्भात बैठक घेऊन कोणताही ठोस निर्णय केला जात नसल्याचा भारिप बमसंचा आरोप आहे. त्यामुळे भारिप बमसं आणि कॉंग्रेसच्या नेत्यांकडून आघाडी संदर्भात "पहिले आप-पहिले आप' येवढीच चर्चा सुरू असल्याने आघाडीचे भविष्य अंधातरीच राहणार काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

संबंधित लेख