prakash ambedkar | Sarkarnama

आंबेडकरांच्या अकोल्यातील भाषणाकडे लक्ष

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

अकोला : अकोल्याच्या इतिहासात 33 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची जोरात तयारी सुरू झाली आहे. या मेळाव्यात भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आपली भुमिका स्पष्ट करणार असल्याने राजकीय वर्तुळाचे या मेळाव्याकडे लक्ष लागले आहे. 

भारतीय बौद्ध महासभेतर्फे दरवर्षी अशोका विजया दशमीच्या दिवशी अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. गौतम बुद्धाचा शांतीचा संदेश देत धम्मध्वज, घोडे, भिक्‍खुसंघ व मुख्य रथासह देशभरातील लाखो बौद्ध बांधव धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात सहभागी होत असतात. 

एक ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या या मेळाव्याची आयोजकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. या मेळाव्यात बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात बाळासाहेब सत्ताधारी भाजपवर काय तोफ डागतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 
 
संबंधित लेख