prakash ambedkar | Sarkarnama

करवाढीच्या मुद्यावर आंबेडकर मांडणार भुमिका

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

अकोला : महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केलेल्या करवाढी विरोधात आंदोलनाचे रान पेटविणाऱ्या भारिप-बमसंने करवाढीसंदर्भात विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर एक सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी आयोजित करण्यात आली असून करवाढ कशी अन्यायकारक आहे, याबाबत बाळासाहेब आंबेडकर भूमिका मांडणार आहेत. 

अकोला महापालिकेच्या करवाढीच्या निर्णयावर विरोधी पक्षांकडून तीव्र आक्षेप घेण्यात येत आहे. शहरातील मालमत्ताधारकांना महापालिका प्रशासनाने कराच्या बजावलेल्या नोटीसमध्ये अवाजवी कर आकारण्यात आला असून याविरोधात भारिप-बमसंचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. याच आंदोलनाचा भाग कायदेशीर लढाई म्हणून महापालिकेने मालमत्ता करवाढीचा फेरविचार करताना केलेली कपात अमान्य करीत भारिप-बमसंने विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. 

या याचिकेवर बुधवारी (1 सप्टेंबर ) अमरावती येथे सुनावणी होणार होती. मात्र, कर्जमाफीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी आयुक्त मुंबईला गेल्याने आता ही सुनावणी एक सप्टेंबर रोजी होणार आहे. मनपाच्या 3 एप्रिल 2017 रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक पाच हाच चुकीचा आहे. त्यामुळे फेरविचाराचा संबंधच येत नसल्याचे भारिप-बमसंने म्हटले आहे. या सुनावणीला ऍड. बाळासाहेब आंबेडकर स्वत: हजर राहून भारिप-बमसंच्या समितीचे सदस्यांच्या उपस्थित त्यांची बाजू मांडणार आहे. 
 
संबंधित लेख