prakash ambedkar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

कर्जमाफी हे भाजप आणि संघाचे केवळ नाटक : प्रकाश आंबेडकर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 जून 2017

अकोला : शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असतांना भाजप आणि आरएसएसचे सरकार कर्जमाफीवर विश्वास ठेवत नाही हे त्यांच्या वागणुकीवरून स्पष्ट दिसून येत आहे. या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी हे केवळ नाटक असल्याची टीका भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा निर्णयावर आंबेडकर यांनी सडेतोड टिका केली. 

अकोला : शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असतांना भाजप आणि आरएसएसचे सरकार कर्जमाफीवर विश्वास ठेवत नाही हे त्यांच्या वागणुकीवरून स्पष्ट दिसून येत आहे. या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी हे केवळ नाटक असल्याची टीका भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा निर्णयावर आंबेडकर यांनी सडेतोड टिका केली. 

कोणतीही घटना घडली की फाशी द्या, ही त्यांची सरळ मागणी असते. अशा संघटनांकडे करूणा व दया ही भावना नसते. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाही पण मध्यावधी निवडणूका यायच्या आहेत व त्या जिंकणे महत्वाचे असल्यामुळे शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून भाजप सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. मात्र, हा निर्णय करतांना अनेक जाचक अटी टाकल्या असून कर्जामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे ढोंग सरकारकडून करण्यात येत आहे असे ते म्हणाले. 

ज्यांनी दीड लाखाच्यापेक्षा जास्त कर्ज घेतले त्यांनी दीड लाखाच्या वरची रक्कम जमा केल्याशिवाय दीड लाखाचे कर्ज माफ होणार नाही. त्याचबरोबरच आर्थिक पत बॅंकेत वाढावी म्हणून ज्यांनी नविन कर्ज काढले आणि नविन कर्जाच्या माध्यमातून जुने कर्ज फेडले अशा शेतकऱ्यांना 2015-16 व 2016-17 चे जुने कर्ज त्यांच्या अंगावर नसल्यामुळे त्यांना सुद्धा या कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. कर्जमाफी देतांना सरकारने दया व करुणेचे तत्व सुद्धा ठेवले नसून कमीत कमी देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप आणि आरएसएसच्या सरकारने खरोखरच शेतकऱ्यांना बुरे दिन दाखविले असतांना शेतीच्या प्रश्नावर लढणारा सुद्धा त्यांच्याच बरोबर राहिला तर शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, असेही आंबेडकर म्हणाले. 

संबंधित लेख