prakash ambedakar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

करवाढीच्या मुद्यावर आंबेडकरांचा अडीच तास युक्तीवाद !

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

अकोला : महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केलेल्या करवाढीविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतलेल्या भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकरांनी न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू केली आहे. मंगळवारी याच मुद्यावर विभागीय आयुक्तांकडे झालेल्या सुनावणीस स्वत: बाळासाहेबांनी अडीच तास युक्तीवाद करत मनपाने अन्यायकारक करवाढ कशी केली, हे विविध आकडेवारी व संदर्भ देत सांगितले. 

अकोला महापालिकेने केलेल्या करवाढीचा मुद्दा सध्या पेटला आहे. या करवाढीला तीव्र विरोध करणाऱ्या भारिप-बमसंकडून बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करून सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडले आहे. करवाढीचा ठराव रद्द करण्याच्या मागणीसाठी महापौर विजय अग्रवाल यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या घराला घेराव घालण्याचे आंदोलन भारिपने केले. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करून 3 एप्रिलच्या सभेत अवाजवी करवाढीचा घेतलेला ठराव रद्द करण्याची मागणी केली आहे. 

या याचिकेवर आज विभागीय आयुक्त पियुष सिंग यांच्याकडे आज सुनावणी झाली. यावेळी बाळासाहेब आंबेडकर, अँड. संतोष राहाटे यांनी युक्तीवाद करीत प्रशासन व पदाधिकारी यांच्या चुका लक्षात आणुन दिल्या. यावेळी मनपातील गटनेत्या धनश्री देव, नगरसेविका किरण बोराखडे, नगरसेवक बबलू जगताप, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकूंद भिरड, माजी नगरसेवक गजानन गवई, मनोहर पंजवाणी, सिद्धार्थ सिरसाट, डॉं. राजकुमार रंगारी, जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे, श्री. सन्ना यांच्या मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके, कर अधिक्षक विजय पारतवार उपस्थित होते. विभागीय आयुक्तांनी करवाढीच्या निर्णयासंदर्भात दोन्ही बाजू ऐकून घेतल्या असुन या प्रकरणात काय निर्णय होतो, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. 

संबंधित लेख