Prakash Ambbedkar is indirectly helping BJP : Ramdas Athavle | Sarkarnama

सध्या 'हवा' असलेले ते नेते अप्रत्यक्ष भाजपास मदत करतात : रामदास आठवले 

शुभांगी पाटील
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

आंबेडकरी चळवळीत सध्या  ' हवा ' असलेले ते नेते अप्रत्यक्ष भाजपास मदत करतात मग मी थेट त्यांच्याशी युती करून मंत्री झालो तर त्यांच्या पोटात का दुखतंय ? असा सवाल रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

तुर्भे: "एकीकडे हिंदुत्ववादी व सनातनी विचारधारेला प्रखर विरोध करायचा आणि दुसरीकडे खासदार ओवेसी यांच्या एमआय एमसह अन्य पक्षाची मोट बांधून निवडणूकीत भारतीय जनता पक्षास पोषक वातावरण निर्माण करायचे. ही भाजपास अप्रत्यक्ष मदत नाही का ? " अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ऍड बाळासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात बोलताना केली . 

पँथर नामदेवराव गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यमाने रिपाइंचे माजी जिल्हाअध्यक्ष पँथर नामदेव गायकवाड यांच्या 6 व्या स्मृति दिनानिमित गुणवंत व्यक्ती आणि आदर्श धार्मिक संस्था , सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण आणि समाजरत्न पुरस्काराने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी(2) ना. रामदास आठवले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले . 

त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ते पुढे म्हणाले की, " 1972 साली दलितांवर होणारे हल्ले, अन्याय अत्याचाराला विरोध करण्यासाठी दलित पँथर स्थापन झाली. नामदेव गायकवाड हे देखील पँथरच्या सुरुवातीपासून या लढ्यात अग्रभागी होते. पँथर चळवळीत जीव ओतून काम करणारे नामदेव गायकवाड सारख्या हजारो युवकांनी मराठवाडा नामांतर चळवळ , लॉंग मार्च , रिडल्स सारख्या आंदोलनात सक्रीय भाग घेतला. "

" आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पँथर संघटनेच्या महाराष्टभर छावण्या होत्या . त्याच वेळी 1990 साली आंबेडकरी समाजात ऐक्याच्या मनस्थितीत होता. पँथर बरखास्त करू नका तिचे स्वतन्त्र अस्तित्व राहू द्या असा दबाव माझ्यावर पँथर छावणी प्रमुख यांच्याकडून येत होता. मात्र ऐक्यास आठवले विरोध करतात असा समज होइल म्हणून मी नाईलाजाने  पँथर बरखास्त केली ,"अशी खंत आठवले यांनी बोलून दाखवली . 

आज मी भाजपा मंत्रिमंडळ मध्ये असून भाजपा सोडणे आता इतक्यात शक्य नसल्याचे त्यांनी सांगत एकत्रित आरपीआयच्या भूमिकेला बगल दिली.

यावेळी पँथर नामदेव गायकवाड यांच्या स्मरणार्थ चाळीस जणांना  डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण व समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संबंधित लेख