pradip nimbalakar suicides | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांची आत्महत्या; निवडीनंतर पाच दिवसांतच कृत्य

ज्ञानेश्वर रायते
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

भवानीनगर : येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांनी आज दुपारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांनी ते पिस्तूल साफ करत असताना चुकून गोळी उडाल्याचा दावा केला आहे. पोलिस हा दावा तपासून घेत आहेत.

भवानीनगर : येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांनी आज दुपारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांनी ते पिस्तूल साफ करत असताना चुकून गोळी उडाल्याचा दावा केला आहे. पोलिस हा दावा तपासून घेत आहेत.

राज्यातील साखर कारखानादीर अग्रेसर समजल्या जाणाऱ्या छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रदीप निंबाळकर यांची ३१ आॅक्टोबर रोजीच बिनविरोध निवड झाली होती. त्यांच्या निवडीनंतर जेसीबीने गुलाल उधळून आंनदोत्सव साजरा करण्यात आला होता. परंतु, निवडीनंतर पाचच दिवसांत त्यांनी केलेल्या आत्महत्येमुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रासह इंदापूर व बारामतीकरांना मोठा धक्का बसला आहे. 

छत्रपती कारखान्यात गेल्या काही दिवसांपासून कंत्राटी कामगारांचा संप सुरू होता. या कामगारांशी बैठक घेऊ निंबाळकर यांना हा संप आजच मिटविला. परंतु, कामगारांना बोनस देण्याच्या मुद्‌द्‌यावर काही संचालकांचे कार्यकारी संचालकांशी मतभेद झाले होते. त्यामुळे निंबाळकर तणावात होते.

कारखान्यापासून त्यांचे घर दोन किलोमीटर अंतरावर आहे. ते दुपारी  अडीचच्या सुमारास सुमारास स्वतःच्या घरात वरच्या मजल्यावर होते. इतर कुटुंबीय खालच्या मजल्यावर होते. त्यांच्याकडे स्वतःचे पिस्तूल होते. या पिस्तूलातून त्यांनी स्वतःच्या छातीत गोळी झाडली. गोळी झाडल्याचा आवाज ऐकून कुटुंबीय वर पळाले. तेव्हा निंबाळकर रक्ताच्या थारोळ्यात होते. त्यांना तातडीने बारामती येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, वडील, एक मुलगा, एक मुलगी व एक भाऊ असा परिवार आहे.  

संबंधित लेख