माणमधून देशमुखांना बळ देण्याचे शरद पवारांचे संकेत

माणमधून देशमुखांना बळ देण्याचे शरद पवारांचे संकेत

सातारा : प्रभाकर देशमुख यांचे जलसंधारणाचे चांगले काम करत आहेत, तुमच्या सर्वांची साथ त्यांना मिळू देत. तसेच तुमची ताकद त्यांच्या पाठीशी राहू देत, असे अशी अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. प्रभाकर देशमुख यांच्या लोधवडे (ता. माण) येथील निवासस्थानी श्री. पवार यांनी स्नेह भोजन घेतल्यानंतर त्यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते झाडून उपस्थित होते. यासह इतर पक्षातील कार्यकर्तेही उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, माण तालुक्‍यातील जनतेने लोकसहभागातून जलसंधारणाचे चांगले काम केले आहे. त्यासाठी आम्ही केंद्राकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू. प्रभाकर देशमुख यांनी जलसंधारणांत चांगले काम करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नामुळे आगामी काळात माण तालुका दुष्काळमुक्त होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे देशमुखांना तुमच्या सर्वांची साथ मिळायला हवी. तुमच्या सर्वांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी करा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

बैठकीनंतर श्री. पवार कोल्हापूरकडे रवाना झाले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शेखर गोरे समर्थक, तसेच इतर पक्षातील पदाधिकारी ही आवर्जून उपस्थित होते. श्री. पवारांचा लोधवडे दौरा प्रभाकर देशमुख यांना बळ देणारा ठरला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com