power show by pune`s shivsainik | Sarkarnama

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पुण्यातील इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

पुणे : आगामी निवडणुकांबाबत भाजप-शिवसेना यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात असतानाच पुण्यातील शिवसैनिक मात्र "एकला चलो रे'च्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील दसरा मेळाव्याला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिवतिर्थावर दाखल झाले. 

शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातून तब्बल आठ ते दहा हजार शिवसैनिकांनी मेळाव्याला हजेरी लावली आहे. दोन्ही पक्षांच्या युतीच्या शक्‍यतेच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील शिवसेनेच्या नेत्यांशी मात्र, आतापासूनच शक्तीप्रदर्शन करीत, स्वतंत्र लढण्याची तयारी चालविली आहे. 

पुण्यातील उमेदवारीसाठी असलेल्या इच्छुकांनी आपापल्या पातळीवर या मेळाव्यासाठी संघटन केले. शिवसेनेची ताकद असलेल्या हडपसर, कोथरुड आणि वडगावशेरी मतदारसंघातील सर्वाधिक शिवसैनिकांनी मेळाव्याला हजेरी लावल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून मतदारसंघानिहाय मेळावे, बैठका घेऊन स्थानिक नेत्यांनी तयारी केली होती. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघातून एक-दीड हजार शिवसैनिकांनी नोंदणी केल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकरिसा शंभर बसगाड्या आणि अन्य वाहनांची सोय करण्यात आली आहे. 

यासंदर्भात शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे म्हणाले, ""निवडणुकीपेक्षा शिवसैनिकांसाठी दसरा मेळावा महत्त्वाचा असतो. दरवर्षीच पुण्यातील शिवसैनिक मेळाव्याला उत्स्फूर्तपणे येतात. मात्र, यंदाही मोठ्या प्रमाणात शिवैसैनिक आले आहेत. त्यासाठी शाखाप्रमुखांपासून शहरप्रमुखांच्या पातळीवर नियोजन करण्यात आले होते. महिला आघाडीच्या पातळीवर मेळाव्याची तयारी केली होती.'' ""निवडणुकांसाठी पक्षप्रमुख जो आदेश देतील, त्यानुसार शिवसैनिक काम करतील. केवळ निवडणुका म्हणून मेळाव्याला गर्दी करीत नसल्याचे मोकाटे यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख