power minister travels in local railway | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

ऊर्जामंत्री बावनकुळेंचा खड्डे टाळण्यासाठी  लोकल प्रवास; ते देखील विंडो सीटने!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

मुंबई : राज्याला वीज पुरवठ्याचे नियोजन करणाऱ्या राज्य भार प्रेषण केंद्राची पाहणी आणि आढावा बैठक घेण्याच्या दृष्टीने ठाण्यातील कळवा येथे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज गेले होते. मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या धास्तीने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंडपर्यंत लोकलने प्रवास केला.

कळवा येथे होणाऱ्या या बैठकीत जाण्यासाठी दीड ते दोन तास रस्ते वाहतुकीने लागणार होते. त्याऐवजी लोकलने प्रवास करून बावनकुळे तासाभरात बैठकीच्या ठिकाणी पोहोचले. मुंबईच्या लोकल प्रवासाचा एक वेगळा अनुभव घेताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी लोकलमधील प्रवाशांशी विविध विषयांवर संवाद साधला. त्यांनी लोकलमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशीही गप्पा मारल्या.

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डयांची समस्या किती गंभीर झाली आहे, हे बावनकुळे यांच्या प्रवासामुळे दिसून आले आहे. त्यात मेट्रोचे चालणारे काम, पावसाचे साचलेले पाणी, रोजच्या गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवासाचा वेळ हा तीस ते पाऊण तासांनी वाढला आहे. ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर सर्वच मंत्र्यांना पुढे लोकलनेच प्रवास करण्याची वेळ येणार आहे. 
 
संबंधित लेख