pot holes on road which goes to mla`s house | Sarkarnama

आमदार गोरेंच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था! तक्रार करायची कुणाकडे?

हरिदास कड
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

चाकण : पुणे-नाशिक महामार्गावरून आंबेठाण कडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था आंबेठाण चौकाजवळ बिकट झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. झित्राईमळ्याजवळ तसेच इतर ठिकाणी रस्त्याची अवस्था चांगली नाही. हा रस्ता आमदार सुरेश गोरे तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांच्या निवासस्थानाकडे तसेच दोघांही नेत्यांच्या कार्यालयाकडे जातो.

चाकणमधील हा व्हीआयपी रस्ता असताना त्याची दुरवस्था झाली आहे. ती पाहील्यानंतर तक्रार आता नेमकी कोणाकडे करायची, असा सवाल सामान्य नागरिक, उद्योजक, कामगार, विद्यार्थी या रस्त्यावरून ये-जा करतात. दोघेही नेते मतदारसंघात लाखोंची विकासकामे केली, अशा गप्पा मारत आहेत. तसे फ्लेक्स या रस्त्यावरून येताना-जाताना नागरिकांना दिसतात. तरीही या रस्त्याचे चित्र असे का, या प्रश्नाचे उत्तर कोण देणार?
.
पुणे-नाशिक महामार्गावरून आंबेठाण चौकातून आंबेठाण रस्ता पुढे जातो. हा रस्ता आंबेठाण, वराळे, भांबोली, करंजविहीरे , शिवे, वहागाव , देशमुखवाडी, गडद,वांद्रा असा आहे.या रस्त्यावरून कंपन्यांची वाहने तसेच इतर वाहने, एसटी बसेस आदी धावतात. या रस्त्यावर आंबेठाण, वराळे, भांबोली परिसरात औद्योगिकिकरण झाल्याने वर्दळ मोठी वाढली आहे. या रस्त्यावर काही गृहप्रकल्प ही उभारण्यात आले आहेत. तसेच मोठी रहीवाशी वस्ती आहे. त्यामुळे हा रस्ता महत्वाचा आहे.

या रस्त्याची अनेक वेळा दुरूस्तीची तसेच डांबरीकरणाची कामे झाली आहेत. पण ही सारी कामे निकृष्ट झाल्याने हा रस्ता वारंवार उखडत आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहने कशी चालवायची, असा पेच निर्माण झाला आहे. या खड्ड्यात दुचाकी पडून अपघात होत आहेत. या रस्त्याचे काम चांगल्या ठेकेदाराकडून करावे अशी मागणी आहे. मलिदा खाणाऱ्या ठेकेदारांकडून नको असा लोकांचा संताप व्यक्त होत आहे. काम होत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष देत नाहीत का, याचेही उत्तर मिळत नाही.

संबंधित लेख