post against modi | Sarkarnama

मोदींविरुद्ध पोस्ट : बाळासाहेब थोरातांचा अंगरक्षक निलंबित! 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोशल मीडियावर अक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याने एका पोलिसास निलंबित करण्यात आले आहे. रमेश काळू शिंदे असे संबंधित पोलिसाचे नाव आहे. काळे हे कॉग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून काम पाहत होते. 

शिंदे यांनी एक महिन्यांपूर्वी व्हॉटसऍपवर पंतप्रधानांच्या विरोधात अक्षेपार्ह मजकूर शेअर केला होता. हा मजकूर इतर ग्रुपवर शेअर झाल्याच्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ही कारवाई करीत शिंदे यांना निलंबित केले. मुंबईत सोशल मिडीयावर आक्षेपार्ह लिखान केल्याने संबंधितांना नोटीसा बजावल्याचे प्रकरण ताजे आहे. आता पोलिसांवरच कारवाई झाल्याने इतर क्षेत्रातही नेटिझन्समधून भितीचे वातावरण होऊ लागले आहे. या कारवाईचा धसका घेत संगमनेर तालुक्‍यातील अनेक व्हॉटसऍप ग्रुप रडारावर असल्याची चर्चा आज दिवसभर सुरू झाल्याने अनेक ऍडमीनने आपले ग्रुप बंद केल्याचे समजते. दरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चाच्या एका कार्यकर्त्याने याबाबत संगमनेर पोलिस ठाण्यात सप्टेंबरमध्ये तक्रार दिली असून त्यानुसार ही कारवाई झाल्याचे समजते. 

संबंधित लेख