politics on toilet in Ambegaon | Sarkarnama

आंबेगावात सरपंचाच्या शौचालयावरून राजकारण अन् दोन ठिकाणी उपोषण! 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 मार्च 2018

पुणे : धामणी (ता. आंबेगाव) येथील सरपंच सागर जाधव यांच्यकडे शौचालय आहे की नाही, या वादावरून दोन ठिकाणी आज उपोषण झाले. त्याची झळ पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांना बसली. आपल्याकडे शौचालय असूनही वळसे पाटील यांचे कार्यकर्ते हे विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप करत सरपंच सागर जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या पुण्यातील कार्यालयासमोर उपोषण आजपासून सुरू केले.

दुसरीकडे सरपंच सागर जाधव यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती हे पाठीशी घालत असल्याचे सांगत त्यांचे विरोधक सचिन जाधव हे आंबेगाव पंचायतीच्या कार्यालयासमोर घोडेगाव येथे उपोषणास बसले.

उपाध्यक्ष वळसे पाटील हे मनमानी करून जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याचा आरोप सरपंच जाधव यांनी यावेळी केला. याच गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिन जाधव यांना वळसे पाटलांची फूस असल्याचा त्यांचा आरोप आहे. सरपंचांकडे शौचालय नसल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी या विरोधकांची आहे. ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे. पंचायत समितीचे शिवसेनेचे सदस्य रवींद्र करंजखिले आणि वळसे पाटील यांच्यातील वादाचे पडसाद या दोन्ही उपोषणामागे आहेत.

जिल्हा परिषद मुख्यालयासमोर सरपंच यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य आकाश जाधव मिलिंद शेळके, शिवसेनेचे धामणी शाखाप्रमुख दीपक जाधव, माजी शाखाप्रमुख अमोल जाधव आदींसह सुमारे 20 ग्रामस्थ उपोषणास बसले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

उपोषणासाठीचा विषय हा स्थानिक पातळीवरील राजकारणाचा आहे. त्यामुळे या विषयाचा आणि जिल्हा परिषदेचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. तरीही उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि आपणा सर्वांची संयुक्त बैठक घेऊ आणि सामोपचाराने हा विषय मार्गी लावू, असे आश्‍वासन अध्यक्ष देवकाते यांनी यावेळी सरपंच जाधव यांना दिले. 

राजकीय आकसाने आरोप : विवेक वळसे पाटील 

मुळात हा विषय माझ्याशी किंवा माझा या विषयाशी काहीही सबंध नाही. जो विषय माझ्याशी निगडितच नाही, त्या विषयांबाबत माझ्यावर काहीही आरोप करणे अयोग्यच आहे. हे आरोप केवळ राजकीय आकसापोटी आणि नैराश्‍यातून जाणीवपूर्वक केले जात आहेत. मला बदनाम करण्यासाठी राजकीय हेतूने प्रेरित होऊन रचलेले हे षडयंत्र आहे. परंतु या आंदोलनाशी माझा काहीही सबंध नसल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी या आरोपांबाबत दिली आहे. 

दुसरीकडे आंबेगाव तालुका पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी व धामणी ग्रामपंचायत हे संगनमताने माहिती देण्यास टाळाटाळ व दिशाभूल करत असल्याच्या निषेधार्थ धामणीतील ग्रामस्थ सचिन राजाराम जाधव हे घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पंचायत समिती कार्यालयासमोर गुरुवारपासून (ता.8) बेमुदत उपोषणाला बसले आहेत. येथील सरपंच सागर जाधव यांनी नामनिर्देशन पत्रातील माहिती खोटी दिलेली आहे.

शौचालय नोंदीबाबत जुजबी माहिती दिली आहे. तसेच रहदारीच्या रस्त्यालगत त्यांच्या मालकीच्या जागेची हद्द सोडून सांडपाणी खड्डा घेतला आहे. याबाबत समाधानकारक चौकशी अहवाल दिला जात नाही. शिवाय सरपंचांवर कोणतीही कारवाई झाली नाही. याची प्रशासनाने दाखल घ्यावी आणि सरपंचांवर रीतसर कारवाई करावी, अशी मागणी सचिन जाधव यांनी केली आहे. 

संबंधित लेख