Political earthquake in July | Sarkarnama

जुलै महिन्यात महाराष्ट्रात राजकीय भूकंप - संजय राऊत

संपत देवगिरे
शनिवार, 10 जून 2017

शिवसेना जनतेच्या प्रश्‍नावर कोणत्याही संघर्षाला घाबरत नाही. सिवसैनीक त्यासाठी तयारच असतो. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण कोणत्या दिशेने जात आहे, काय काय घडामोडी घडत आहेत. त्यावर आमचे लक्ष आहेच. राज्य सरकारने शेतकरी संपाबाबत केलेली कृती आमच्या धोरणाविरुध्द आहे. - संजय राऊत

नाशिक - भाजप शेतकऱ्यांचे प्रश्‍न समजाऊन घेण्यात, सोडविण्यात अजिबात रस घेत नसून त्यांना शेतकऱ्यांमध्ये त्यात फूट पाडायची आहे. त्यामुळेच शिवसेनेला सरसकट कर्जमाफीपेक्षा काहीही कमी मंजूर नाही. 'लग्न' (मध्यावधी निवडणूक) जवळच असून जुलै महिन्यात महाराष्ट्रात भूकंप होईल असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज येथे केले.

शिवसंपर्क मोहिमेसाठी नाशिक दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ''शिवसेना जनतेच्या प्रश्‍नावर कोणत्याही संघर्षाला घाबरत नाही. सिवसैनीक त्यासाठी तयारच असतो. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण कोणत्या दिशेने जात आहे, काय काय घडामोडी घडत आहेत. त्यावर आमचे लक्ष आहेच. राज्य सरकारने शेतकरी संपाबाबत केलेली कृती आमच्या धोरणाविरुध्द आहे. अल्पभूधारक अथवा अन्य शंका उपस्थित करुन दिलेली कर्जमाफी आम्हाला अजिबात मान्य नाही. पूर्ण सरसकट कर्जमाफीच आम्हाला हवी आहे, यासंदर्भात शासनाने जो मंत्रीगट जाहीर केला त्यात शिवसेनेचें मत्री दिवाकर रावते यांच्याही समावेष आहे. ते त्या गटात सहभागी होतील. मात्र, अंतिम भूमिका शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरेच घेतील.''

ते पुढे म्हणाले, ''शिवसंपर्क मोहिम ही लोकांचे प्रश्‍न समजुन घेऊन त्यांच्या सोडवणgकीसाठी घेतलेली शिवसेनेची मोहिम आहे. यासंदर्भात सबंध राज्यात जनजागृती होईल. कार्यकर्त्यांनी शिवसेनेची भूमिका या काळात लोकांपर्यंत पोहोचवावी. राज्यातील भूसंपादन कायदा शिवसेनेच्या दबावामुळे होऊ शकला नाही असा दावा करुन शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे षडयंत्र भूसंपादन या
कायद्याच्या मुळाशी होते. सध्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात गेऊन त्यांना नागवले जात आहे. अक्ष्रशः त्यांना कंगाल केले जात आहे. त्यामुळेच समृध्दी महामार्गाचा मार्ग आम्ही थांबवू. उध्दव ठाकरे यांनी समृध्दी महामार्ग होणार नाही असे निक्षुन सांगितले आहे. त्यामुळे हा महामार्ग होणार नाहीच हा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा.''

भाजपचे सरकार 'ढ'
''भारतीय जनता पक्षाचे सरकार सामान्य नागरीकांच्या प्रश्नावर 'ढ' निघाले. त्यांचा केवळ अभ्यास सुरु असतो. परिक्षा उलटून गेली तरी यांचा अभ्यासच सुरु आहे. ते जनतेच्या विरोधात आहेत. शेतकर-यांच्या विरोधात आहेत. मित्र पक्षांना संपविने हे त्यांचे धोरण असून शिवसेनेच्या विरोधात त्यांचे षडयंत्र सुरु आहे. त्यामुळे त्यांना उत्तर दिले जाईल. शिवसेना स्वस्थ बसणार नाही.'' असेही राऊत शेवटी म्हणाले.

 

संबंधित लेख