police vithhal koyandes sorry | Sarkarnama

नीतेश राणे- वैभव नाईक यांच्या रेट्यामुळे विठ्ठल कोयंडेने मागितली माफी! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

सिंधुदुर्गनगरी : आंदोलनात पोलिस आणि आंदोलक यांच्यात धुमचक्री झाली. कसाल आणि ओरोस खर्येवाडीतील आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ओरोस पोलिस ठाण्यात मराठा कार्यकर्त्यांनी धाव घेतली. आमदार नीतेश राणे आणि वैभव नाईक ओरोस पोलिस ठाण्यात दाखल झाले. कसाल येथील आंदोलनकर्त्यांविरोधात अनुद्‌गार काढलेल्या पोलिसाने जाहीर माफी मागीतल्याशिवाय येथून हटणार नाही, असा आक्रमक पावित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. 

मराठा समाजावरून अनुद्‌गार काढणाऱ्या पोलिस कर्मचारी विठ्ठल कोयंडे यांच्या विरोधात जनप्रक्षोभ वाढत असताना, पोलिस प्रशासन मात्र माफीची मागणे नियमात नाही, असे सांगत होते. त्यामुळे पोलिस ठाण्यात संबंधित पोलिसाच्या विरोधात घोषणा देत जमाव आणखीनच आक्रमक झाला. जिल्ह्यातून कार्यकर्ते ओरोस येथे येऊ लागले. 
सुरुवातीला पोलिसाला माफी मागण्यास तयार नसलेले पोलिस आक्रमक जमाव आणि आमदार नीतेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे नरमले. आंदोलनकर्ते आक्रमक बनल्याने त्यांच्या समोर माफी न मागता आमदार नीतेश राणे, आमदार वैभव नाईक, मराठा समाज जिल्हाध्यक्ष सुहास सावंत यांच्या समक्ष संबंधित पोलिसाने माफी मागितली. 

कसाल आंदोलनावेळी ताब्यात घेतलेल्या बाबा सावंत व बाळासाहेब सूर्यवंशी यांना वैद्यकिय तपासणीसाठी पोलिस नेत नसल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले होते. यावेळी काहींनी पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. त्यामुळे येथील वातावरण तंग झाले होते. 

संबंधित लेख