पोलिस पाटलांना शस्त्र नाही पण मानधन वेळेत देणार : केसरकर

राज्यातील खेड्यापाड्यातील भांडण-तंटे मिटविण्यासाठी तंटामुक्‍त समितीच्या अध्यक्षाच्या जोडीला आता पोलिस पाटील आहेत. त्यांच्या मानधनात 1 एप्रिलपासून वाढ केली असून प्रत्येक महिन्याच्या १० तारेखपर्यंत ते पोलिस पाटलांना मिळेल. दरम्यान, त्यांना शस्त्र देण्याचा विचार सरकारचा नसून गडचिरोलीसारख्या संवेदनशिल परिसरातून मागणी आल्यास त्याचा निश्‍चित विचार केला जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी येथे दिली.
पोलिस पाटलांना शस्त्र नाही पण मानधन वेळेत देणार : केसरकर

सोलापूर : राज्यातील खेड्यापाड्यातील भांडण-तंटे मिटविण्यासाठी तंटामुक्‍त समितीच्या अध्यक्षाच्या जोडीला आता पोलिस पाटील आहेत. त्यांच्या मानधनात 1 एप्रिलपासून वाढ केली असून प्रत्येक महिन्याच्या १० तारेखपर्यंत ते पोलिस पाटलांना मिळेल. दरम्यान, त्यांना शस्त्र देण्याचा विचार सरकारचा नसून गडचिरोलीसारख्या संवेदनशिल परिसरातून मागणी आल्यास त्याचा निश्‍चित विचार केला जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी येथे दिली.

राज्य सरकारने पोलिस पाटलांच्या मानधनात एप्रिलपासून वाढ केली परंतु, अद्याप त्यांना नवे मानधन मिळालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर केसरकर म्हणाले, गावे तंटामुक्‍त होण्यासाठी पोलिस व गावकऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा म्हणजे पोलिस पाटील आहेत. त्यांना वेळेवर मानधन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, पोलिस पाटलांना शस्त्र (बंदूक) दिल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो, शस्त्र अथवा त्यातील गोळ्या हरवल्यास त्याची सखोल चौकशी होते. त्यामुळे त्यांना शस्त्र दिले जाणार नाही. परंतु, आणखी सुविधा वाढविण्याचा विचार आहे. राज्यात सुमारे २८ हजार पोलिस पाटील कार्यरत असून त्यांना आता सुधारित मानधन मिळणार आहे. त्यासाठी शासनाकडून दरवर्षी २४ कोटी ७० लाख रुपये मिळतील, असेही केसरकर यांनी या वेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com