पोलीस पाटील, कोतवालांचे मानधन वाढणार 

पोलीस पाटील, कोतवालांचे मानधन वाढणार 

कोल्हापूर : राज्यातील पोलीस पाटील, कोतवाल व आशा स्वयंसेविका यांच्या मानधन वाढीबाबत एकछत्री समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालावर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शिक्‍कामोर्तब केल्याचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी सांगितले. 

मागील दोन वर्षांपासून या मानधनवाढीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरु होता, त्याला यश आल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

पोलीस पाटलांचे मानधन वाढ करण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अनुषंगाने राज्यातील पोलीस पाटलांनी आपल्या प्रमुख मागण्या सादर केल्या होत्या. मात्र मानधन वाढिबाबत निर्णय झाला नाही.पोलिस पाटलांचे मानधन वाढीकरिता अर्थसंककल्पीय अधिवेशनांमध्ये लक्षवेधी सूचना मांडून हा प्रश्नही सभागृहात उपस्थित केल्याचे आबिटकर यांनी सांगितले. 

या प्रश्‍नावर शासनाने समिती स्थापन केली होती, तिचा अहवाल सादर झाला आहे. या अहवालाची अंमलबजावणी करावी, यासाठी आमदार आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी महसूल राज्यमंत्री राठोड यांची भेट घेतली. यावेळी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणीची ग्वाही मंत्र्यांकडून देण्यात आली. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे राज्य सचिव कमलाकर मांगले, योगेश पाटील,रवींद्र पवार, धनाजी खोत, अवधूत परुळेकर आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com