Police officers transferred In Pune district | Sarkarnama

पुणे जिल्ह्यातील १४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

जनार्दन दांडगे 
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

 आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केल्या आहेत.

लोणी काळभोर :  आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केल्या आहेत.

याबाबत काल शनिवारी आदेश काढण्यात आला आहे. या बदल्या तात्पुरत्या असल्याचे बदली आदेशात म्हटले आहे.

बदली झालेल्या अधिका-याचे नाव, नेमणुकीचे पोलिस स्टेशन, कंसात नवीन पोलिस स्टेशन :
 निळकंठ राठोड - भिगवण (यवत), 
अजय गोरड नारायणगाव (मंचर), 
सूरज बनसोडे - ओतूर (जुन्नर), 
विकास बडवे - वडगाव निंबाळकर (लोणीकंद), 
अरविंद काटे- वालचंदनगर (बारामती शहर),
 सुवर्णा हुलवान- पाटोळे- वेल्हा (लोणी काळभोर),

भालचंद्र शिंदे - राजगड (पौड), 
अर्जुन घोडेपाटील-शिरूर (नारायणगाव), 
रमेश खुणे - स्थानिक गुन्हे शाखा (ओतूर),
 समाधान चवरे-बारामती शहर (वडगाव निंबाळकर), 
महेश ढवाण - लोणी काळभोर (भिगवण), 
गणेश कानगुडे - यवत (वालचंदनगर),
 विकास दिंडुरे - लोणीकंद (वेल्हा), 
दत्तात्रेय दराडे - नियंत्रण कक्ष (राजगड).

संबंधित लेख