Police Officers Plays Lezim in Ganesh Immersion Procession in Pandharpur | Sarkarnama

पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळेंनी गणेश विसर्जन मिरवणूकीत धरला लेझीमचा ठेका

भारत नागणे
रविवार, 23 सप्टेंबर 2018

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पंढरपुरातील अबाल वृध्द मोठ्या भक्ती भावाने मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे गणेश भक्तांच्या संरक्षणासाठी पोलिस शहरातील  रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गणरायाची वाजत गाजत मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये कर्कश आवाजाच्या डाॅल्बी किंवा डीजेचा वापर न करता पारंपारिक लेझीम खेळत मिरवणूक काढण्यात आली.

भारत नागणे 
पंढरपूर : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सर्वच जण आनंदाने मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. परंतु 24 तास ट्युटीवर असणाऱ्या पोलिसांना मात्र अशा सार्वजनिक उत्सवात सहभागी होऊन आनंद घेणे दुरापास्त होते. परंतु, आज गणेश विसर्जनाच्या तणावाच्या कामातूनही पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी एका बाजूला आपले कर्तव्य बजावत दुसरीकडे एक गणेश भक्त म्हणून गणेश विसर्जन मिरवणूकीत लेझीम खेळत मिरवणुकीचा आनंद घेतला.
 
लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पंढरपुरातील अबाल वृध्द मोठ्या भक्ती भावाने मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे गणेश भक्तांच्या संरक्षणासाठी पोलिस शहरातील  रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गणरायाची वाजत गाजत मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये कर्कश आवाजाच्या डाॅल्बी किंवा डीजेचा वापर न करता पारंपारिक लेझीम खेळत मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी डोक्यावर फेटा, कुर्ता  आणि पायजमा अशा पारंपारिक वेशांत सहभागी झाले होते. याचवेळी शालेय विद्यार्थींनी  लेझामावर ताल धरला होता. पारंपारिक खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अशा गर्दीत बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना लेझीम खेळण्याचा मोह आवरला नाही. हातात लेझीम घेऊन मिरवणुकीत सहभगी  होत लहान मुलांसोबत हलगीच्या तालावर ते लेझीमच्या खेळात दंग झाले. आपला अधिकारी लेझीम खेळत असल्याचे पाहून पोलिस कर्मचाऱ्यांनीही मग ठेका धरला.
 
संबंधित लेख