Police lodge criminal offence against us if we shut the toll plaza: Shivendra raje | Sarkarnama

तर पोलिस आमच्यावरच 307 दाखल करतात : शिवेंद्रसिंहराजे 

सरकारनामा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

आम्ही टोलनाका बंद करावा म्हणून आंदोलन केले की पोलिस आमच्यावरच 307 चे गुन्हे दाखल करतात.

सातारा : जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाची पावसामुळे काय अवस्था झाली आहे, हे सर्वांना माहित आहे. तरीही टोलनाका सुरू आहे. आम्ही टोलनाका बंद करावा म्हणून आंदोलन केले की पोलिस आमच्यावरच 307 चे गुन्हे दाखल करतात. त्यामुळे आम्ही आंदोलन करत नाही, असे स्पष्ट मत साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले. 

काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून महामार्गावरही मोठ्याप्रमाणात खड्डे पाडले आहेत, याबाबत आपण काही भुमिका घेणार आहात का, या प्रश्‍नावर शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, "काही ग्रामीण रस्त्यांसह महामार्गाची अवस्थाही सर्वांना माहिती आहे. आम्ही टोलनाक्‍याविरोधात आंदोलन केले तर पोलिस आमच्यावरच 307 चे गुन्हे दाखल करतात. त्यामुळे आम्ही आंदोलन करत नाही . तसेच ग्रामीण रस्त्यांची काही ठिकाणी दुरवस्था झालेली आहे. पण आम्ही रस्त्यांची दहा कामे सूचविली तर चारच कामे मंजूर होतात, त्यामुळे रस्त्यांच्या कामांना पुरेसा निधीही मिळत नाही."

संबंधित लेख