police life save in chalan voilence | Sarkarnama

चाकणमधील हिंसाचारात पोलिसांचा असा वाचला जीव!

हरिदास कड
मंगळवार, 31 जुलै 2018

चाकण : मराठा आरक्षणाच्या निमित्ताने चाकण येथे काल झालेल्या हिंसक आंदोलनात पोलिसांनाही समाजकंटकांनी सोडले नाही. काही संतप्त तरूणांनी हातातील लोखंडी गज, पाईप आदी हत्याराने एसटीबसस्थानकाच्या आवारात दुपारी पावणेतीनच्या सुमारास पोलिस नाईक अजय भापकर यांच्या डोक्यात मारहाण केली. वेळीच रुग्णवाहिका मिळाल्याने रासकर यांचा जीव वाचला.

चाकण : मराठा आरक्षणाच्या निमित्ताने चाकण येथे काल झालेल्या हिंसक आंदोलनात पोलिसांनाही समाजकंटकांनी सोडले नाही. काही संतप्त तरूणांनी हातातील लोखंडी गज, पाईप आदी हत्याराने एसटीबसस्थानकाच्या आवारात दुपारी पावणेतीनच्या सुमारास पोलिस नाईक अजय भापकर यांच्या डोक्यात मारहाण केली. वेळीच रुग्णवाहिका मिळाल्याने रासकर यांचा जीव वाचला.

या मारहाणीत जखमी झालेले भापकर बसस्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावर जीव वाचविण्यासाठी कसेबसे पळत सुटले. दुसऱ्या मजल्यावरील कुलकर्णी हाॅस्पीटलमध्ये ते लपून बसले. ही माहिती माजी आमदार दिलीप मोहीते यांच्या पत्नी सुरेखा मोहीते यांना समजली. त्यानंतर मोहीते यांनी ही माहीती जयहींद हाॅस्पिटलचे सयाजी गांडेकर यांना फोनवरून सांगितली. त्यानंतर गांडेकर यांनी रूग्णवाहीका आणली आणि भापकर यांना जयहींद हाॅस्पीटलमध्ये नेल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले आणि त्यांचा जीव वाचला. सध्या भापकर यांच्यावर पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

पोलिस नाईक भापकर हे हिंसक जमावाला शांत करण्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून प्रयत्न करत होते. पुणे-नाशिक महामार्गावर ते जमावात घुसून तरूणांना शांत करण्यासाठी धटावत होते. त्यांच्या अंगावर सिव्हील ड्रेस होता. चाकण बसस्थानक आवारात भापकर हे संतप्त तरूणांच्या मागे पळत असताना काही तरूणांनी त्यांच्या हातातील लोखंडी गजाने त्यांच्या डोक्यात जबर मारहाण केली. यावेळी तरूणांनी त्यांना शिव्याही दिल्या. या मारहाणीत भापकर गंभीर जखमी झाले.

त्याही अवस्थेत भापकर हे स्वतःचा जीव वाचविण्यासाठी धडपड करत कुलकर्णी हाॅस्पीटलमध्ये गेले .तेथे त्यांची अवस्था पाहील्यानंतर काहींनी ही माहीती माजी आमदार मोहीते यांच्या पत्नी सुरेखा मोहीते यांना दिली. त्यानंतर मोहीते यांनी जयहींद हाॅस्पीटलचे सयाजी गांडेकर यांना मोबाईलवर संपर्क साधून भापकर यांना तेथून हाॅस्पीटलमध्ये रूग्णवाहीकेतून नेण्याची विनंती केली.

रूग्णालयातील कोणीही येथे येण्यास धजावत नव्हता. हजारावर जमाव तेथे होता. तो जमाव पोलिसांनाही मारहाण करत होता. त्यामुळे पोलिसही तेथून पळून जात होते. यावेळी गांडेकर यांनी स्वतः रूग्णवाहीका बसस्थानकात आणली व भापकर यांना जखमी अवस्थेत रूग्णालयात नेले. याबाबत गांडेकर यांनी सांगितले की, भापकर यांना नेताना तरूणांचा जमाव पुढे आला , संतप्त जमावाने विरोध केला. मग पुढे एक रूग्णवाहिका, त्यापुढे दुसरी रूग्णवाहीका असे करून त्यांना नेण्यात आले. त्यांच्या डोक्यात पंचवीस टाके पडले असून मोठी जखम आहे. ते बेशुध्दाअवस्थेत होते. रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांना पुणे येथे हलविण्यात आले.
 

संबंधित लेख