police health | Sarkarnama

निवृत्त पोलिसांना मोफत उपचार : मुख्यमंत्री 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

पोलिस उद्यान अर्थात "जनगान' उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर रात्री उशिरापर्यंत उद्यानात सेल्फी काढण्याठी गर्दी होती. पुढील तीन महिने उद्यानात मोफत प्रवेश
असणार आहे. त्यानंतर प्रत्येकी दहा रुपये तिकीट असणार आहे. यातून जमणारा निधी पोलिस कल्याणासाठी वापरला जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
यांनी व्यासपीठावरूनच जाहीर केले. 

कोल्हापूर : देशातील प्रत्येकाचा उर भरून आणणारा 303 फूट उंच ध्वज पर्यटकांत ऊर्जा निर्माण करणारा ठरेल, येथून देशभक्तीचे प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच महात्मा फुले योजनेतून निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत उपचार देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

देशातील दुसरा आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उंच ध्वजाचे अनावरण आणि पोलिस उद्यान अर्थात "जनगान' उद्यानाचा लोकार्पण सोहळा फडणवीस यांच्याहस्ते झाला. कार्यक्रमाला अभिनेता अक्षयकुमार, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, महापौर हसीना फरास, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडीक, पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,""अक्षयकुमार बरोबर हेलिकॉप्टर मधून येताना तो म्हणत होता. मी हेलिकॉप्टर मधून ध्वजस्तंभावर उतरून स्टंट करूनच अनावरण
करतो आणि तेथूनच थेट खाली मैदानात उतरतो. आताही संधी हुकली असली तरीही आपण आणखी एक ध्वज तयार करणार आहोत. त्याचे अनावरण अक्षयकुमार यांच्या हस्ते स्टंट करून करूया. आजपर्यंतच्या चित्रपटात अक्षयकुमारने जे स्टंट केले त्यासाठी डमी वापरला नाही.' 

पोलिसांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले," पोलिसांसाठी घर प्रकल्प उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. थोड्याच दिवसांत निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांनाही महात्मा जोतिबा फुले योजनेतून उपचार दिले जातील. 24 तास काम करणाऱ्या पोलिसांच्या मागे आपण राहिले पाहिजे. त्यांनी मनात आणले तर ते काहीही करू शकतात. म्हणूनच आज आरोप सिद्धीचा दर 58 टक्‍क्‍यांपर्यंत पोहचला आहे. त्यांच्यासाठी घर आणि आरोग्य सुविधा देणसाठी शासन कटिबद्ध आहे.'' 

 

संबंधित लेख