police force in action | Sarkarnama

विदर्भात पोलिसांचा तगडा बंदोबस्त, नागपुरात काही मराठा आंदोलक ताब्यात

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीच्या समर्थनार्थ आज नागपुरातील सक्करदरा भागात आंदोलन करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. यामुळे आतापर्यंत नागपुरात कोणताही हिंसेचा प्रकार घडलेला नाही. मराठवाड्यात हिंसा वाढल्याने विदर्भात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारपर्यंत कोणत्याही हिंसक घटनेची माहिती मिळाली नाही. 

मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यात हिंसात्मक वळण मिळाले आहे. यापार्श्‍वभूमीवर आज सकाळी महाल व सक्करदार या भागा मराठा बहुल भागात आंदोलकांनी रॅली काढली. या रॅलीचे नेतृत्व कॉंग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके, नरेंद्र मोहिते यांनी केले. रॅलीमध्ये सरकारच्या विरोधात घोषणा देत असताना रॅलीतील युवक दुकाने बंद करीत होते. यामुळे पोलिसांनी या युवकांना ताब्यात घेऊन अटक केली. महाल भागातही पोलिसांनी धरपकड करून अनेक मराठा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

मराठा आंदोलनाला हिंसक वळण मिळेल, या शक्‍यतेने नागपुरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागपूरप्रमाणे अमरावती, अकोला, बुलडाणा व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागपुरात चौकाचौकात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. 

संबंधित लेख