लाच प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यावर गोळी झाडणाऱ्या पोलिस निरीक्षकाला कोठडी

लाच प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यावर गोळी झाडणाऱ्या पोलिस निरीक्षकाला कोठडी

अकोला : गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गोळीबार केलेल्या  पिंजर पोलिस स्टेशनच ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर नागलकर याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका कर्मचाऱ्यावर गोळी झाडल्याची घटना बुधवारी (ता. १२) घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी ठाणेदार नागलकर यास गुरुवारी (ता. १३) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बार्शी टाकळी येथील एका ४८ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. चार जून रोजी पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाळूची वाहतूक करू देण्यासाठी अनुमती मिळावी म्हणून ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि त्याचे आणखी तीन साथीदार यांनी आठ हजार रूपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदारास लाच देण्याचे नसल्याने त्यांनी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून ठाणेदार नंदकिशोर नागलकर आणि नाईक पोलिस कॉन्स्टेबल महादेव राखोंडे, अरूण नागदिवे यांच्यासह खासगी व्यक्ती आरीफ अब्दुल सत्तार यांच्यावर बुधवारी (ता.१२) गुन्हा दाखल करण्यासाठी पिंजर पोलिस ठाणे गाठले होते.

मात्र, यावेळी ठाणेदार नंदकिशोर नागलकर याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी सचिन धात्रक यांच्यावर जवळ असलेल्या सर्व्हीस रीव्हॉल्वरमधून गोळी झाडली होती. यातील जखमीवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठाणेदार नागलकरसह नाईक पोलिस कॉन्स्टेबल महादेव राखोंडे, अरूण नवघरे आणि खासगी व्यक्ती आरीफ अब्दुल सत्तार यांच्यावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केली आहे. तर नागलकर याच्यावर गोळी झाडल्याप्रकरणी पिंजर पोलिस ठाण्यात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यावरून आरोपीस प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीस मोनिका आयरलॅंड यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ठाणेदार नागलकर यास २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पिस्तूल मागताच झाडली गोळी....

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठाणेदार नागलकर यांना ‘तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायचा आहे. त्यासाठी तुमच्याकडे असलेली पिस्तूल आमच्या ताब्यात द्या’ असे म्हणताच ठाणेदार नागलकर यांनी त्यांच्या जवळ असलेली सर्व्हिस गन बाहेर काढून एसीबीचे कर्मचारी सचिन बबनराव धात्रक (रा. पिंजर) यांच्या उजव्या पायावर गोळी झाडली. यामध्ये धात्रक हे गंभीर जखमी झाले. नंदकिशोर नागलकर यांच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या होत्या. तर चार दिवसापूर्वी नागलकर यांची अकोली पीटीएसमध्ये पदोन्नतीवर बदलीसुद्धा झाली होती. 

वाळू प्रकरणात सेटिंगचा आरोप 
महान येथे काही दिवसांपूर्वी वाळूने भरलेले एक वाहन पकडण्यात आले होते. या वाहनांवर कारवाई टाळण्यासाठी सेटिंग झाल्याची चर्चा होती. याप्रकरणाची फोन रेकॉर्डींगच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंध विभाग ठाणेदारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. त्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा पोलिस स्टेशन परिसरात रंगत होती. 

सचिन धात्रक जाणार होते पीएसआयच्या ट्रेनिंगला 
मूळ पिंजर येथील रहिवासी असलेले पोलिस कॉन्स्टेबल सचिन धात्रक हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत आहेत. ते एमपीएससी परीक्षा २२ एप्रिल रोजी उत्तीर्ण झाले असून, गुरुवारी ते पोलिस उपनिरीक्षक पदाच्या ट्रेनिंगसाठी जाणार होते, अशी माहिती धात्रक यांच्या कुटुंबियांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com