POLICE CRACK DOWN MARATHA ANDOLAN | Sarkarnama

प्रवीण गायकवाड घरी स्थानबद्ध तर; कोंढरेंचा पोलिसांना गुंगारा

उमेश घोंगडे
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी विधानसभेवर मोर्चा काढू नये, यासाठी पोलिसांनी मोर्च्याच्या कार्यकर्त्यांची आज राज्यभर धरपकड़ केली. पुण्यातही पोलिसांनी आंदोलनात नेतृत्त्व करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड़ यांना पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी आज सकाळी स्थानबद्ध करण्यात आले. मराठा संघाचे राजेंद्र कोढ़रे यांना ही ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांना गुंगारा देत ते मुंबईतील आझाद मैदानावर पोचले.

कोंढ़रे म्हणाले की रविवारी रात्री उशिरा पोलिसांचा फ़ोन आला होता. सकाळी पोलिस घरी आले. मात्र त्या आधी मी घर सोडले होते. मुंबईच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोटारी तपासण्यात आल्या. मात्र मोटार बदलत आझाद मैदानावर पोहोचलो. मुळात पोलिसांनी आशा प्रकारे कार्यकर्त्यांना अडवून स्थानबद्ध करण्याची गरज नव्हती. राज्यात विविध भागात अशा प्रकारे कार्यकर्त्यांना रोखण्यात आले आहे. याही परिस्थितीत आझाद मैदानावर शेकडो कार्यकर्ते जमा झाले आहेत. पुणे जिल्ह्यात संवाद यात्रा काढणारे शांताराम कुंजीर हे कालच मुंबईत पोचले.

प्रवीण गायकवाड यांनीदेखील पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला. ते म्हणाले की सकाळी पोलिस घरी आले. त्यांनी पोलीस ठाण्यात चला, असे सांगितले. मात्र, तुम्ही मला असे नेऊ शकत नाही. अटक करायची असेल तर वाॅरंट दाखवा किंवा मी गुन्हा काय केलाय ते सांगा, अशी विचारणा मी केली. आतादेखील पोलीस माझ्या घरा खाली बसून आहेत. संविधान सन्मान दिवस आज साजरा करीत असताना हे सरकार संविधानाची पायमल्ली करीत असल्याची टीका त्यांनी केली.

विकास पसलकर, विराज तावरे, प्रशांत धुमाळ, तुषार काकडे, संतोष शिंदे, युवराज दिसले, धनंजय जाधव, अमोल पवार, सुरेश शेंडकर, रघुनाथ चित्रे पाटील, संगिता भालेराव, आबासाहेब पऱ्हाड, पूजा झोले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

संबंधित लेख