Police constables celebrate bhaubeej festival in Station because of sugarcane agitation | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

ऊस आंदोलनामुळे सांगली पोलिसांची भाऊबीज पोलीस ठाण्यातच !

विजय पाटील 
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

*

सांगली :  ऊस आंदोलनामुळे सांगली पोलिसांना आपली भाऊबीज पोलीस ठाण्यातच साजरी करावी लागली. ऊस आंदोलनामुळे पोलिसांच्या दिवाळी सुट्ट्यासुद्धा रद्द करण्यात आल्याने बंदोबस्तात असणाऱ्या पोलीस कर्मचारी यांना पोलीस भगिनींनी पोलीस ठाण्यात  भाऊबीज साजरी केली . 

यावेळी आपल्या बहिणीकडे जाऊ न शकलेल्या पोलीस भावांना महिला पोलीसांना पोलीस ठाण्यातच ओळवत आपली भाऊबीज साजरी केली. यावेळी बंदोबस्त बजावत असतानाही घरची बहीण नाही मात्र पोलीस बहिणींनी ओळवाळून आपली भाऊबीज केल्याने पोलीस बांधवांचे उर भरून आले.

सांगली शहर पोलीस ठाण्यात हृदयस्पर्शी सोहळा  रंगला होता. या अनोख्या कार्यक्रमामुळे ऊस आंदोलनात व्यस्त असणाऱ्या पोलीस बांधवांना किमान भाऊबीज साजरी करता आली याबद्दल पोलीस बांधवांनी समाधान व्यक्त केलं.

 या  कार्यक्रमात महिला पोलीस कर्मचाऱ्यानी सहभागी होत आपल्या भावबीजेची उणीव भरून काढली. यावेळी बंदोबस्तामुळे आपल्या भावाकडे जाऊ न शकणाऱ्या महिला पोलीसानी सुद्धा आज आपल्या भावाची उणीव भरून काढीत आपल्या पोलीस बांधवांना ओवाळले . यामुळे पोलीस ठाण्यातही वातावरण भावपूर्ण बनले होते.

संबंधित लेख