police Constable in aurangabad | Sarkarnama

सोमवारी ते बंदोबस्तासाठी आले आणि दुसऱ्या दिवशी मृत्यूने गाठले ...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

उस्मानाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कायंगाव टोका येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सोमवारी (ता. 23) उस्मानाबाद पोलीस मुख्यालयातून 40 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची तुकडी औरंगाबादेत दाखल झाली होती. यातच श्‍याम लक्ष्मण काटगांवकर यांचाही समावेश होता. कायगांव येथे बंदोबस्तात असतांनाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. 

उस्मानाबाद पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले श्‍याम काटगांवकर हे मूळचे तुळजापूर तालुक्‍यातील काटगावचे (ता. तुळजापूर) रहिवाशी. 30 जून 1990 रोजी ते पोलिस हवालदार म्हणून रुजू झाले होते. पाच वर्षे त्यांनी महामार्ग पोलिस म्हणूनही काम केले. उस्मानाबाद शहरातील सांजारोड परिसरात ते कुटुंबियासह राहतात. कायगाव येथे बंदोबस्तासाठी उस्मानाबादच्या पोलिस मुख्यालयातून 40 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तुकडी सोमवारी औरंगाबादेत दाखल झाली होती. श्‍याम काटगांवकर यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर याची माहिती पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर त्यांच्या पत्नी व काही नातेवाईक औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. 

श्‍याम काटगावकर यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह उस्मानाबाद जिल्ह्यात आणल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सोमवारी ड्युटीसाठी औरंगाबादेत दाखल झालेल्या श्‍याम काटगांवकर यांचा दुसऱ्याच दिवशी दुदैवी मृत्यू झाल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख