पानसरे हत्या प्रकरणी अमित देगवेकरला अटक : आठव्या संशयिताला नऊ दिवसांची पोलिस कोठडी

पानसरे हत्या प्रकरणी अमित देगवेकरला अटक : आठव्या संशयिताला नऊ दिवसांची पोलिस कोठडी

कोल्हापूर : जेष्ठ नेते गोविंद पानसरे हत्ये प्रकरणी अमित रवींद्र देगवेकर (वय 38, कळणे, सिंधुदुर्ग) या आणखी एका संशयितास कोल्हापूर एसआयटीने अटक केली. सोमवारी रात्री उशिरा बंगलोर न्यायालयातून त्याचा ताबा घेतला. आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.जी.सोनी यांनी त्याला बुधवारपर्यंत (ता. 23 ) पोलिस कोठडी सुनावली. पानसरे हत्येप्रकरणी अटकेची कारवाई झालेला हा आठवा संशयित आहे. 

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकाराने बेंगलोर एसआयटी अमित देगवेकरला अटक केली आहे. या तपासा दरम्यान देगवेकर चा अंधश्रद्धा निर्मूलनचे डॉ. नरेंद्र दाभोलकर व जेष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येत सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयने देगवेकरचा ताबा घेऊन चौकशी केली होती. यानंतर त्याची पुन्हा बेंगलोर कारागृहात रवानगी केली होती. पानसरे हत्या प्रकरणी कोल्हापूर एसआयटीने सोमवारी रात्री बेंगलोर न्यायालयाच्या परवानगीने कारागृहातून देगवेकरचा ताबा घेतला.

आज सकाळी त्याच्यावर अटकेची कारवाई करून जिल्हा सत्र न्यायालयात समोर हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. जी. सोनी यांच्या समोर सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील ऍड. शिवाजीराव राणे यांनी युक्तिवाद करताना देगवेकर हा सनातन संस्थेसाठी पूर्ण वेळ काम करत होता. तसेच या गुन्ह्यातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे व फरारी सारंग आकोळकर यांच्या तो नेहमी संपर्कात होता. तावडे व देगवेकर हे दोघे अनेक कार्यक्रमात सोबत असायचे. शस्त्र व बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणावेळी ही देगवेकर उपस्थित होता. त्यामुळे या हत्येच्या कटात त्याचा सहभाग होता हे स्पष्ट असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. पुढील सखोल तपासासाठी 14 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद ही राणे यांनी केला.

संशयिताच्या वतीने युक्तिवाद करताना ऍड.समीर पटवर्धन यांनी बेंगलोर एसआयटी चा तपास सीबीआय कडून व सीबीआयचा तपास कोल्हापूर एसआयटी कडून ""कॉपीपेस्ट'' केला जात आहे. मागील संशयितांच्या पोलीस कोठडीसाठी जी कारणे दिली तीच कारणे यावेळी दिली जात आहेत. यातून काहीच हाती लागणार नाही, असा युक्तिवाद करत पोलीस कोठडी देऊ नये अशी विनंती केली. पोलिस कोठडी दिलीच तर 3 दिवसांची द्यावी.त्या नंतर तपास अहवाल मागवून पुढील निर्णय घ्यावा, अशी विनंती पटवर्धन यांनी न्यायालयासमोर केली. 

दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर प्रथमवर्ग न्यायाधीश जी.जी. सोनी यांनी डेगवेकर ला 23 जानेवारी पर्यत पोलिस कोठडी सुनावली. नऊ दिवस पोलीस कोठडी सुनावल्या नंतर संशयित देगवेकर याला रोज भेटण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती अॅड. पटवर्धन यांनी न्यायालयाला केली. यावर न्यायालयाने संशयित कोल्हापूरमध्ये असेल त्या वेळी दररोज सायंकाळी 5 ते 6 या वेळेत भेटण्याची परवानगी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com