विष पाजेपर्यंत खासगी सावकाराची मजल : सासवड पोलिसांची कारवाई

विष पाजेपर्यंत खासगी सावकाराची मजल : सासवड पोलिसांची कारवाई

सासवड : येथील पोलिसांनी बेकायदेशीर सावकारीविरूद्ध विशेष अभियान सुरु केल्याने अल्पावधीत तीन प्रकरणे उजेडात आली. याबाबत तिन्ही गुन्हे दाखल केले आहेत. गरजूंना परतफेड केली नाही म्हणून विष पाजून मारण्याचा प्रयत्न करणे, आई - भगिनींचे गळ्यातील दागिने गहाण ठेवणे, जमिनीचे कुलमुखत्यारपत्र करुन वारेमाप व्याज वसूल करण्याच्या बाबी पुढे येत आहेत. त्यामुळे कोणाच्याही दहशतीने गप्प न बसत त्रास होणाऱया लोकांनी आणखी संख्येने पुढे यावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी केले. 

सासवडसह पुरंदर तालुक्यात बेकायदेशिर सावकारीचे अनेक प्रकार होतात.. हे गेली अनेक दिवस ऐकण्यास मिळत होते. मात्र पिळवणूक होणारे लोक कायद्याचा आधार न घेता आतापर्यंत दहशतीने गप्प बसत होते.

याबाबत बोलताना पाटील म्हणाले, ``सावकारीविरुध्द नुकतेच विशेष अभियान सुरु केले. त्याशिवाय पोलीस ठाण्यात सावकारीच्या तक्रारी घेण्यासाठी सहायक राजेश पोळ, अजित माने यांच्यामार्फत विशेष कक्ष स्थापला. या कक्षामार्फत व अभियानाच्या बळाने आतापर्यंत सावकारीच्या तीन तक्रारी आल्या, त्यातील तीनही प्रकरणात सावकारी अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला. काही सावकारांवर अटकेची कारवाई केली. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डाॅ. संदिप पखाले, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी ही सावकारी विरुध्दची मोहिम तीव्र करण्यास सांगितले आहे. त्यामुळे धनदांडग्या व गुंडप्रवृत्तीच्या सावकारांचा बंदोबस्त करण्यासाठी लोकांनी न डगमगता पुढे यावे

पुरंदर तालुक्यात व परिसरात सावकारी धंद्याची तेजी असते. त्याचा फार गाजावाजा नसतो. मात्र वसूली अतिशय वाईट पध्दतीने होते. आम्ही खासगीत माहिती घेतली.. कित्येक लोक पैशाची गरज म्हणून आशा बेकायदेशिर सावकारीच्या नादी लागतात, त्यानंतर व्याज भरुनच लोक जेरीस येतात. नंतर वाढीव वसुलीसाठी कित्येक लोकांची वाईट पध्दतीने पिळवणुक होते. जुन्या प्रकरणांत काहींचा यात बळी गेल्याच्या, काहींना जमीन विकावी लागल्याचे, काहींची संपत्ती लयाला गेल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे आशा गुंड प्रवृत्तीच्या, बेकायदेशिर सावकारीचा बंदोबस्त करुन मुस्क्या आवळल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com