police | Sarkarnama

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील 45 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मे 2017

हिंगोली : हिंगोली जिल्हा पोलिस दल बदल्यांनी ढवळून निघाले असून 45 कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, 129 कर्मचाऱ्यांची विनंती अमान्य करण्यात आली आहे. या विनंती बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी काढले आहेत. येथील पोलिस दलात बदल्यांसाठी मागील एक महिन्यांपासून हालचाली सुरु होत्या एका पोलिस ठाण्यात सहा वर्ष झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या केल्या आहेत. पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी समुपदेशन पद्धतीने बदल्या केल्या आहेत.

हिंगोली : हिंगोली जिल्हा पोलिस दल बदल्यांनी ढवळून निघाले असून 45 कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, 129 कर्मचाऱ्यांची विनंती अमान्य करण्यात आली आहे. या विनंती बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी काढले आहेत. येथील पोलिस दलात बदल्यांसाठी मागील एक महिन्यांपासून हालचाली सुरु होत्या एका पोलिस ठाण्यात सहा वर्ष झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या केल्या आहेत. पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी समुपदेशन पद्धतीने बदल्या केल्या आहेत. विनंतीवरून बदली झालेले अधिकारी कर्मचारी व कंसात बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहेत. 
यामध्ये गजानन बर्गे कळमनुरी (हिंगोली), फकरोद्दीन सरताजोद्दीन सिद्दीकी कळमनुरी (औंढा नागनाथ), पारू चंपतराव कुडमेथे कळमनुरी (महिला दक्षता विभाग हिंगोली), केशव गारोळे नर्सी नामदेव (वसमत शहर), रामराव शिंदे औंढा (वसमत शहर), यशवंत गुरुपवार औंढा (ता.जिविशा औंढा), तुकाराम आमले सेनगाव (कुरूंदा), आसेफ बशीर शेख आखाडा बाळापूर (वसमत शहर), अर्जून पडघान वसमत शहर (गोरेगाव), शैलेश चौधरी स्थानिक गुन्हे शाखा (पोलिस मुख्यालय हिंगोली), सपना गुप्ता पोलिस निरीक्षक कक्ष (हिंगोली शहर), ज्ञानेश्वर कदम हिंगोली (कुरूंदा), बंडू राठोड हिंगोली (कुरूंदा), विनायक जानकर हिंगोली (हट्टा), सुरेश जाधव हिंगोली (कुरुंदा), सुनीता धनवे हिंगोली (कळमनुरी), विजय महाले हिंगोली (गोरेगाव), राजाराम कदम हिंगोली (हट्टा), बालाजी साठे हिंगोली (वसमत शहर), राहूल राठोड हिंगोली (वसमत शहर), नरेंद्र येरमे हिंगोली (वसमत शहर), विशाल काळे हिंगोली (हट्टा), शेख शफी शेख युसूफ हिंगोली (वसमत शहर), सतीश दिलवाले हिंगोली (वसमत शहर), मुंजाजी पतंगे हिंगोली (वसमत शहर), साईनाथ कंठे हिंगोली (वसमत शहर), प्रकाश भुरके हिंगोली (वसमत शहर), गजानन पुरी हिंगोली (वसमत शहर), गणेश जाधव हिंगोली (कुरुंदा), भागीरथ सवंडकर हिंगोली (वसमत शहर), घनश्‍याम केंद्रेकर हिंगोली (मो.प.वि.हिंगोली). 

धनंजय क्षीरसागर हिंगोली (जि.वि.शा.हिंगोली), मुक्‍ता दहिफळे हिंगोली शहर (पोलिस मुख्यालय हिंगोली), इंदुमती ढाकणे कुरूंदा (बाळापूर), सारिका राठोड हिंगोली शहर (बासंबा), पंढरीनाथ नागरे नर्सी नामदेव (औंढा नागनाथ), कैलास मिटकरे हिंगोली ग्रामीण (जि.वि.शा. हिंगोली) ब्रह्माजी अंभुरे मो.प.वि. हिंगोली (हिंगोली शहर), शेख जमीर शेख गुलाब सेनगाव (मो.प.वि. हिंगोली), राजेश मुलगीर मो.प.वि. हिंगोली (वसमत शहर), फालाजी डवरे हट्टा (मो.प.वि. हिंगोली), नागनाथ घुगे मो.प.वि. हिंगोली (सेनगाव), बाबूराव पाईकराव मो.प.वि. हिंगोली (डी.व्ही. कार हिंगोली), हिंमतराव सरनाईक मो.प.वि. हिंगोली (पोलिस उपअधीक्षक मुख्यालय हिंगोली), प्रवीण चव्हाण मो.प.वि. हिंगोली (हट्टा) यांचा समावेश आहे. 

संबंधित लेख