polic firing in takali | Sarkarnama

संतप्त जमावाला रोखण्यासाठी टाकळीत हवेत गोळीबार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

परभणी : टाकळी कुंभकर्ण येथे जमावाला शांत करण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या पथकाने शनिवारी (ता.28) हवेत दोन राऊंड फायर केले. टाकळी कुंभकर्ण येथे ग्रामीण पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर जमावाला रोखण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी टाकळी कुंभकर्ण येथे गेली होती. तेथील जमावाने पोलिस दलाच्या या गाडीला घेरण्याचा प्रयत्न केला. जमावाला शांत कऱण्यासाठी एसआरपीएफचे जवान सुरुवातीला खाली उतरले परंतू जमाव अंगावर चालून आल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी हवेत दोन राऊंड फायर केले अशी माहिती पोलिस अधिक्षक दिलीप झळके यांनी दिली. 

टॅग्स

संबंधित लेख