Pokhran test was done to demonstrate India's power to world | Sarkarnama

पोखरण अणुचाचणीने वाजपेयींनी जगाला भारताचे सामर्थ्य दाखवले

उत्तमसिंह पवार 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा मला खासदार म्हणून दोन टर्म अनुभव आला.

औरंगाबादः अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा मला खासदार म्हणून दोन टर्म अनुभव आला. पोखरण-टु ची चाचणी घेतल्यानंतर ही चाचणी जगाला अणुशक्ती दाखवण्यासाठी नाही तर आम्ही कमी नाही हे दाखवण्यासाठी होती' हे पटवून सांगण्यासाठी जे संसंदीय शिष्टमंडळ कोरिया, अमेरिकेसह युरोपीय देशात पाठवण्यात आले त्या अटलजींनी माझा समावेश केला होता . 

पोखण येथे अणुचाचणी घेतल्यानंतर जगभरात विशेषता युरोपीयन राष्ट्रांमध्ये भारत केमिकल वॉर करू पाहत असल्याची प्रतिमा तयार करण्यात आली होती. हे चित्र खोटे ठरवून भारताची बाजू जगासमोर मांडण्यासाठी निवडक खासदारांचे शिष्टमंडळ विदेशात पाठवण्याचा निर्णय वाजपेयींनी घेतला होता. त्या शिष्टमंडळात त्यांनी माझा समावेश केला. याशिवाय एचआयव्ही, टीबी संदर्भातील चर्चासत्र व बैठकासाठी देखील परदेशात जाण्याची संधी अटलजींमुळेच मला मिळाली. 

1996 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना येथे अटलबिहारी वाजपेयी यांनी माझ्या प्रचारासाठी सभा घेतली होती. तेव्हा मी प्रचंड मतांनी विजयी झालो. तेव्हा केंद्रातील आघाडी सरकार एका मताने तेरा महिन्यात पडले. पण सरकार वाचावे यासाठी कुठल्याही प्रकारची घोडेबाजारी मी खपवून घेणार नाही अशी सक्त ताकीद अटलजींनी दिली होती . 

अटलबिहारी वाजपेयी यांचे जावई रंजन भट्टाचार्य हे माझे चांगले मित्र होते. त्यामुळे दिल्लीत अटलजींच्या निवासस्थानी जाण्याचा आणि त्यांना भेटण्याचा मला अनेकदा योग आला. त्यातून कवी मनाचे तितकेच देशहितासाटी कठारे निर्णय घेणारे, तत्ववादी अटलजी मला अनुभवता आले.

 

( उत्तमसिंह पवार हे जालना लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत . )

संबंधित लेख