pmc leader demands inquiry in corruption cases | Sarkarnama

पुणे पालिकेतील घोटाळ्यांच्या चौकशीची सत्ताधारी नेत्याचीच मागणी

उमेश घोंगडे
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

पुणे : महापापालिकेत पुणे कनेक्शन, एलईडी दिवे असो वा डाटा करप्ट होण्याचे प्रकार हे मोठे घोटाळेच आहेत, असे महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आज स्पष्ट केले. डाटा करप्ट होण्याच्या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीदेखील भिमाले यांनी केली आहे.

महापलिकेचा डाटा जतन करण्यासाठी घेण्यात आलेले सर्व्हर तत्कालिन महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी त्यांच्या आधिकारात खरेदी केले होते. त्यामुळे चौकशी करून कुणावर करणार हादेखील प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. 

डाटा करप्ट झाल्याने महापालिकेचा डिजीटल स्वरूपातील डाटा मोठ्याप्रमाणात नाहीसा झाला आहे. डाटा करप्ट झाला असला तरी आवश्‍यक माहिती उपलब्ध असल्याचे महापलिकेतील संबंधित आधिकारी सांगत आहेत. मात्र करप्ट झालेला डाटा पूर्णपूणे परत मिळू शकत नाही, असे या क्षेत्रातील तज्ञ सांगत आहेत.

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर भिमाले यांनी सर्व घोटोळेच आहेत, अशी भूमिका घेतली आहे. डाटा करप्ट होण्याचा प्रकार सोडला तर एलईडी व पुणे कनेक्‍ट या योजना महापालिकेत आधीपासून कार्यान्वित असल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यामुळेच भिमाले यांनी चौकशी करून कार्यवाहीची मागणी केली आहे. या योजना दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आल्या आहेत, असे भिमाले यांनी सांगितले. 

संबंधित लेख