pmc gb adjourned over maratha reservation | Sarkarnama

पुणे महापालिकेत मराठा आरक्षणावरून दुसऱ्या दिवशीही गोंधळ 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 26 जुलै 2018

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज सलग दुसऱ्या दिवशी गोंधळ उडाला. आरक्षणाची मागणी करीत शिवसेनेसह कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करीत कामकाज बंद पाडले.

शिवेसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या टेबलावरील कुंडी खाली फेकून देत जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे पाऊण तास हा गोंधळ सुरू होता. या गोंधळातच सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. 

मराठा आरक्षण आंदोलनांवरून गेल्या चार दिवसात राज्यभर अनेक ठिकाणी तणावाची स्थिती आहे. त्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारीदेखील उमटले होते. विरोधी पक्षातील नगरसेवकांनी बुधवारीदेखील जोरदार घोषणाबाजी केली होती. कामकाज सुरू झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी घोषणाबाजीला सुरवात केली. या साऱ्या गोंधळात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची कोंडी झाली.

भाजपच्या अनेक मराठा नगरसेवकांना इच्छा असूनही या आंदोलनात भाग घेता येत नव्हता. मात्र त्यांची आंदोलनाला मूक संमती होती. यातील काहीजणांनी सभागृहातच बसून राहणे पसंत केले तर काहीजण सभागृहाबाहेर निघून गेले. पाऊण तास सुरू असलेली घोषणाबाजी व गोंधळामुळे कामकाज पूर्ण बंद पडले. महापौर मुक्ता टिळक यांनी काम सुरू करण्यासाठी नगरसेवकांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र आंदोलनकर्ते नगरसेवक माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख