PMC forgets sambhaji maharaj birth anniversary | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा पुणे पालिकेला विसर

उमेश घोंगडे
सोमवार, 14 मे 2018

पुणे : छत्रपती संभाजी महाराजांची आज 361 जयंती. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शेकडो पुणेकरांनी आज येथे उपस्थिती लावली. महापालिकेकडून या ठिकाणी व्यासपीठ व मंडप उभारला जातो. मात्र यावर्षी ही सारी व्यवस्था करण्यास महापालिका प्रशासन चक्क विसरल्याने विना व्यवस्था उघड्यावरच जयंती साजरी करावी लागली. 

संभाजी ब्रिगेडने या प्रकरणी महापालिकेचा निषेध केला असून हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा आरोप केला आहे. ब्रिगेडच्यावतीने बोलताना विकास पासलकर म्हणाले, " महापालिकेने जाणीवपूर्वक व्यवस्था करण्याचे टाळले आहे. केवळ मते मिळविण्यासाठी छत्रपतींच्या नावाचा वापर सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. ''

संभाजी ब्रिगेडने ही बाब लक्षात आणून देताच महापौर मुक्ता टिळक यांनी ऐनवेळी प्रशासनाला सांगून साऊंडची व्यवस्था करून दिली. दरवर्षी या ठिकाणी सारी जय्यत तयारी करण्यात येते. मात्र दोन दिवसांच्या सुटीमुळे महापालिका प्रशासनाला जयंतीसाठी आवश्‍यक तयारी करण्याचे लक्षातच राहिले नाही.

या संदर्भात बोलताना संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ म्हणाले, " जयंती साजरी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने दरवर्षी व्यासपीठ तसेच इतर आवश्‍यक सुविधा करता येते. व्यासपीठ केल्यामुळे पुतळ्याला हार घालण्यासाठी प्रत्येकाला वर जाता येते. मात्र सर्वसामान्यांना आज वर जाऊन महाराजांच्या पुतळ्याला हार घालता आला नाही.'' दोन दिवसांच्या सुट्यांमुळे आवश्‍यक सुविधा करण्याचे प्रशासनाच्या लक्षात राहिले नाही. त्यामुळे ही चूक झाली. पुढीलवर्षीपासून पुरेशी काळजी घेण्यात येईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. 
 
संबंधित लेख