अमोल कोल्हे यांच्या पहिल्याच भाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची दाद

अमोल कोल्हे यांच्या पहिल्याच भाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची दाद

मंचर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणाचे कौतुक मंगळवारी (ता. २५) केले. "काही निवडक खासदारांनी देशासमोरील समस्या व उपयोजना मांडणाऱ्या मध्ये डॉ. कोल्हे यांचाही समावेश आहे." असे मोदी यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदी यांनी महाराष्ट्रातील खासदार डाॅ. हिना गावित आणि डाॅ. अमोल कोल्हे यांचा आवर्जून उल्लेख केला. कोल्हे यांच्या पहिल्याच भाषणाची त्यामुळे सर्वत्र चर्चा झाली.  

आपल्या भाषणात डॉ कोल्हे म्हणाले होते की सत्ता संचालनासाठी विरोधी पक्ष आणि स्वायत्त संस्था आवश्यक आहेत. सीबीआय, रिझर्व बँक, न्यायपालिकेची स्वायत्तता टिकून राहावी. शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा. स्मशान होऊ नये.'' 

लोकशाही पहिल्यांदा अंमलात आणण्याचे काम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड १७ व्या शतकात जश्या पद्धतीने होता. त्या पद्धतीने पुन्हा एकदा पूर्ववत उभारावा त्यामुळे जगातील आठवे आश्चर्य जगाला दाखवण्याची संधी मिळणार आहे, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com